शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
3
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
4
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
5
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
6
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
7
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
8
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
9
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
10
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
11
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
12
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
13
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
14
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
15
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
16
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
17
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
18
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
19
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
20
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य ३० मार्च २०२१; अचानक धनलाभ झाल्यानं मनावरील भार कमी होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 06:59 IST

Daily Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष - वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने आजचा दिवस फारच चांगला आहे असे श्रीगणेश सांगतात. जोडीदारासह एकत्र वेळ घालवाल आणि प्रेमसुखाचा अनुभव घ्याल. आर्थिक लाभ तसेच प्रवासाची शक्यता. उग्र विचार आणि अधिकार गाजविण्याची भावना वाढेल. आणखी वाचा.

वृषभ - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस शुभफलदायी जाईल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. पूर्ण दिवस आनंद व उत्साहात जाईल. नियोजनाप्रमाणे सर्व कामे पार पडतील. अर्थ विषयक लाभाची शक्यता. माहेर कडून चांगल्या वार्ता समजतील आणि लाभ होईल. आणखी वाचा.

मिथुन - आज शरीर आणि मन बेचैन राहील असे श्रीगणेश सांगतात. नवीन कार्य सुरू करण्याचा बेत आखाल पण काम सुरू करू नका असा सल्ला श्रीगणेश देतात. मानहानी होण्याची शक्यता आहे. संतती विषयक कामात खर्च करावा लागेल. पचनसंस्येचे विकार बळावतील. आणखी वाचा.

कर्क - श्रीगणेश सांगतात की आपला आजचा दिवस अशुभ आहे. आज आनंद आणि उत्साह यांचा अभाव राहील. मन चिंतेने ग्रासलेले व अशांत राहील. घरात भांडणाचे वातावरण असेल. आप्तांबरोबर मतभेद होऊ शकतात. स्त्रियांबरोबर सुद्धा मतभेद व तणाव राहील. पैसा खर्च होईल. अपयश मिळेल. जेवण वेळेवर मिळणार नाही. झोपही शांत मिळणार नाही. आणखी वाचा.

सिंह - श्रीगणेश सांगतात की आपल्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. आज आरोग्य चांगले राहील. भाऊबंदाबरोबर आनंदात वेळ जाईल. त्यांच्याकडून फायदा होईल. एखादया सुंदर स्थळाला भेट देण्यास जाल. मित्र भेटतील. कार्य यशस्वी झाल्याने मित्र आनंदी होतील. आणखी वाचा.

कन्या - आजचा दिवस आपल्याला शुभफल देईल. आपल्या गोड बोलण्याने कोणाचेही मन जिंकू शकाल. कामे सफल होण्याची जास्त शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. त्यांच्यासोबत सुखात दिवस जाईल. आर्थिक लाभ होऊ शकतात. आरोग्य चांगले राहील. प्रवासाचे बेत ठरतील. आणखी वाचा.

तूळ - श्रीगणेश सांगतात आजचा दिवस शुभ फलदायी आहे. रचनात्मक आणि कलात्मक शक्तीची चमक दिसेल. शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्याची काळजी घ्या. सृजनात्मक कार्य हातून घडेल. खंबीर विचाराने काम पूर्ण कराल. आर्थिक योजना ठरवाल. आणखी वाचा.

वृश्चिक - दुर्घटनेपासून सावध राहण्याचा, शस्त्रकियेचा निर्णय न घेण्याचा आणि वादात न पडण्याचा इशारा श्रीगणेश देतात. बोलण्यात कोणाचा अपसमज होऊ नये याकडे लक्ष द्या. शारीरिक कष्ट आणि मानसिक चिंता यामुळे त्रस्त व्हाल. हर्ष आनंदासाठी खर्च करावा लागेल. आणखी वाचा.

धनु - आजचा दिवस आपणाला लाभदायक ठरेल असे गणेश सांगतात. गृहस्थ जीवनाचा पूर्णतः आनंद घ्याल. मित्रांसमवेत रम्य ठिकाणी प्रवासाचा बेत आखाल. उत्पन्नात वाढीचे योग आहेत. आणखी वाचा.

मकर - आज व्यापारविषयक कामात आपणाला लाभ होईल असे श्रीगणेश सांगतात. जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इ. साठी दिवस चांगला आहे. सरकार, मित्र व संबंधितांकडून लाभ होईल. त्यांच्याकडून भेटवस्तू मिळाल्याने आनंद होईल. पण अग्नी, पाणी, अचानक आपत्ती यापासून सावध राहा. व्यावसायिक कार्यासाठी धावपळ होईल. आणखी वाचा.

कुंभ - आजचा दिवस संमिश्र फलदायी जाईल असे श्रीगणेश सांगतात. शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. मानसिक स्वास्थ्य मात्र चांगले राहील. शरीरात स्फूर्ती कमी राहील त्यामुळे काम करण्यात उत्साह वाटणार नाही. वरिष्ठांची नाराजी पण आपणाला खुपेल. आणखी वाचा.

मीन- ईश्वरभक्ती आणी आध्यात्मिक गोष्टींवर लक्ष देवून दिवस घालवा असे श्रीगणेश सांगतात. आज काही प्रमाणात प्रतिकूलतेचा सामना करावा लागेल. तब्बेतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. आजारपणावर अधिक खर्च करावा लागेल. घरातील सर्वांशी संयमाने वागा. अचानक धनलाभ आपल्या मनावरील भार जरा कमी करेल. आणखी वाचा.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष