शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य 16 मार्च, 2022; मित्र-मैत्रिणीच्या भेटी होतील, थोडा संयम ठेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 07:25 IST

Today's horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...  

मेष- मुलांच्या मनातील भावना समजून घ्या. काहींना प्रवास करावा लागेल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल. आर्थिक आवक चांगली राहील. एखादे चांगले पुस्तक वाचून हातावेगळे करा.

वृषभ- नोकरीत अनुकूल बदल होतील. एखाद्या सहकाऱ्यामुळे मनस्ताप सहन करावा लागेल. व्यवहारात स्पष्टता ठेवायला हवी. जीवनसाथीचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. घरी पाव्हण्या-रावळ्यांचा राबता राहील. त्यात बराच वेळ जाईल. सरकारी कामे मार्गी लागतील.

मिथुन- नोकरीत प्रगतीला पूरक वातावरण राहील. अधिकारात वाढ होईल. तुमचे वर्चस्व राहील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. जवळपासच्या प्रवासाचे योग येतील. व्यवसायात विक्री चांगली राहील. जीवनसाथी चांगली साथ देईल. अनोळखी व्यक्तीपासून सावध राहा.

कर्क- आर्थिक आवक उत्तम राहील. मनात आनंदी विचार राहतील. मात्र उत्साहाच्या भरात कुणाला असे बोलू नका, की ज्यामुळे लोक नाराज होतील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. मालमत्तेच्या कामांना गती मिळेल. जीवनसाथीची चांगली साथ राहील.

सिंह- मन प्रसन्न राहील. कामाचा ताण कमी होईल. त्यासाठी केलेले प्रयत्न कारणी लागतील. जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल. आरोग्याची काळजी घ्या. घरातील वडीलधाऱ्या मंडळींची काळजी घ्या. महत्त्वाच्या कामात यश मिळेल.

कन्या- महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. प्रवासाचे योग येतील. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. जीवनसाथीचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. आरोग्याची काळजी घ्या. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. वाहन जपून चालवा. नावलौकिक वाढवणाऱ्या घटना घडतील.

तूळ- धनलाभाच्या दृष्टीने अत्यंत चांगला काळ आहे. विविध प्रकारचे लाभ होतील. पैशाचा ओघ सतत चालू राहील. मित्र-मैत्रिणीच्या सहवासात मजेत वेळ जाईल. नोकरीत प्रगतीच्या दिशेने वाटचाल चालू राहील. मुलांशी संवाद साधा. त्यांच्याशी वाद टाळा.

वृश्चिक- नोकरीत अनुकूल घटना घडतील. काही बदल होतील. ते फायदेशीर ठरतील. महिलांना नोकरी आणि घरातील वाढती कामे अशी तारेवरची कसरत करावी लागेल. व्यवसायात विक्री चांगली होईल, एखादा धाडसी निर्णय घ्याल. आपले अंदाज बरोबर ठरतील,

धनू- जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. धनलक्ष्मीची कृपा आपल्यावर राहील. भाग्यांची चांगली साथ राहील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. अडचणी दूर होतील. पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास होतील. नोकरीत तुमचे महत्त्व वाढेल. तुमच्या आवडीचे पदार्थ खाण्यास मिळतील.

मकर- व्यवसायात आगेकूच सुरू राहील. आर्थिक बाजू बळकट होईल. एखाद्या महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. वादविवादात पडू नका. वाहन जपून चालवा. मनासारखे भोजन मिळेल. जीवनसाथी चांगली साथ देईल. जीवनसाथीची काळजी घ्या.

कुंभ- महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. तब्येतीच्या तक्रारी दूर होतील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल, मौजमजा करण्यासाठी पैसा खर्च होईल.

मीन- आर्थिक आवक चांगली राहील. परिचित लोकांची मदत मिळेल. मित्र-मैत्रिणीच्या भेटी होतील, थोडे संयमाने वागण्याची गरज आहे. आरोग्याची काळजी घ्या. दगदग होईल, अशी कामे करू नका. शक्यतो आराम करा.

- विजय देशपांडे, ज्योतिष विशारद 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष