शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य - १६ जानेवारी २०२२; धन, करिअरच्या बाबती या राशींना मिळेल भाग्याची साथ, व्यावसायिक लाभ मिळणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 07:31 IST

Todays Horoscope 16 January 2022 : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे आणि तुम्हाला तुमच्या जोडीदाराची साथ आणि सहकार्य मिळेल. आरोग्याबाबत सावध राहा. आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडाल. आर्थिक बाबतीत दिवस लाभदायक आहे. प्रवासात यश मिळेल. सासरच्या लोकांकडून फायदा होईल. 

वृषभ – आजचा दिवस तुम्हाला लाभ देणार आहे. कौटुंबिक आणि व्यवसायिक लाभ मिळतील. इतरांचे सहकार्य मिळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल आणि नशीबही साथ देईल. उत्पन्न आणि खर्चामध्ये समतोल राखा. वाहन वापरताना दक्षता घ्या.मिथुन – आजचा दिवस तुम्हाला लाभ देणारा आहे. धन, पद, प्रतिष्ठा लाभेल. फालतू खर्चावर नियंत्रण ठेवा. खर्चावर नियंत्रण ठेवा. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. तुमच्या जोडीदाराची साथ मिळेल.

कर्क – आजचा दिवस खास आहे. नोकरी-व्यवसायामध्ये यश संपादन कराल. सर्वांशी सौहार्दपूर्ण संबंध राहतील. तुमच्या खाण्याच्या-पिण्याच्या सवयींवर संयम ठेवा. अवाजवी खर्च टाळा. प्रवासात तुमच्या सामानाची काळजी घ्या, चोरी किंवा नुकसान होण्याची शक्यता आहे.

सिंह – आजचा दिवस लाभदायक आहे. व्यवसायात नव्या योजनांना चालना मिळेल. भेटवस्तू आणि सन्मान मिळेल. प्रवासातून लाभ मिळेल आणि फायदा होईल. प्रेमसंबंध मजबूत होतील, जीवनसाथीची साथ मिळेल. वाहन वापरताना काळजी घ्या. 

कन्या – शैक्षणिक स्पर्धेत केलेल्या प्रयत्नांना फळ मिळेल. आज अध्यापनाशी संबंधित लोकांना विशेष लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. काहीतरी मौल्यवान मिळवण्याची इच्छा पूर्ण होईल. भाग्य तुम्हाला साथ देईल. उत्पन्न आणि खर्चामध्ये समतोल राखा. धनलाभ होईल.

तूळ – आजचा दिवस शुभ असून आर्थिक आणि व्यावसायिक दिशेने केलेले प्रयत्न फलदायी ठरतील. धन, मान-सन्मान, यश, कीर्ती वाढेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. धार्मिक कार्य कराल. कुटुंबात आनंद राहील.

वृश्चिक – आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील आणि नशीब तुम्हाला साथ देईल. प्रवास आनंददायी आणि लाभदायक ठरेल. वाहन वापरात सावधगिरी बाळगा. दुखापत होऊ शकते.

धनू – आजचा दिवस खास आहे. राजकीय दिशेने केलेल्या प्रयत्नांना फळ मिळेल. इतरांचे सहकार्य घेण्यात यश मिळेल. आजची गुंतवणूक भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. प्रेमसंबंधात गोडवा राहील. तब्येतीबाबत हलगर्जीपणा टाळा. धनलाभ होईल.

मकर – आजचा दिवस शुभ आहे आणि व्यावसायिक दिशेने केलेले प्रयत्न फळ देतील. मुलांसंबंधित चांगली बातमी मिळेल. पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा. भाग्य तुम्हाला साथ देईल. प्रेमसंबंध मजबूत होतील. वाहन वापरात सावधगिरी बाळगा.

कुंभ – जोडीदाराच्या आरोग्याबाबत जागरुक राहण्याची गरज आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्याबाबत सावध राहा. मनोरंजनाच्या संधी मिळतील. विरोधक पराभूत होतील. कोणीतरी तुम्हाला आर्थिक मदत करेल आणि त्याचा तुम्हाला फायदा होईल.

मीन – शैक्षणिक स्पर्धेत विशेष यश मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. प्रकृतीची काळजी घ्या. बोलण्यात नम्रता तुम्हाला आदर देईल. दिवसभरात धावपळ होईल आणि तुमची दिनचर्या खूप व्यस्त असेल.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष