शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य 11 जानेवारी, 2022; अकल्पनीय लाभ, महत्वाचे निरोप येतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2022 07:52 IST

Today's horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

मेष- सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. नावलौकिक वाढेल. विविध कामे मार्गी लागतील. कामात उत्साह राहील. उत्साहाच्या भरात कुणाचा अपमान होईल असे बोलू नका. वरिष्ठांशी मतभेद होईल. मात्र वाद विकोपाला जाणार नाही याची काळजी घ्या.

वृषभ - महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. थोडा संयम ठेवा. करण्याची गरज सावधगिरी बाळगा. देईल. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कागदोपत्री पूर्तता करण्यास वेळ द्या. घरातील कामांचा आढावा घ्या. 

मिथुन - महत्त्वाचा निरोप येईल. त्यामुळे कामात व्यस्त राहावे लागेल. लोकांच्या भेटीगाठी होतील. आर्थिक आवक उत्तम राहील. जुनी येणी वसूल होतील. जोडीदाराचे चांगले सहकार्य मिळेल. प्रेमाची कबुली देण्यास हरकत नाही. दुसऱ्यांच्यासाठी झटावे लागेल.

कर्क - तुमच्या कामाचे कौतुक होईल. विविध प्रकारचे लाभ होतील. हातून चांगला उपक्रम राबविला जाईल. नोकरीत प्रगतीला पूरक वातावरण राहील. काहीना नवीन जबाबदारी घ्यावी लागेल. चांगल्या बातम्या कानावर पडतील, कामानिमित धावपळ करावी लागेल.

सिंह - मनात सकारात्मक विचार राहतील. आशावादी दृष्टिकोन ठेवून कामे कराल. चांगल्या लोकांच्या सहवासात याल. योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन मिळेल. नोकरीत व्यस्त राहाल. मुलांना यश मिळेल. इतरांच्या भांडणात पडू नका.

कन्या - नोकरीत मनासारख्या घटना घडतील. तुमचे वजन वाढेल. तुमच्या शब्दाचा मान राखला जाईल. तब्येतीची काळजी घ्या. आराम करण्याची गरज आहे. घरात आनंदी वातावरण राहील. महत्त्वाचे काम पुढे ढकलता आले तर बरे राहील. त्यामुळे वेळ व पैसा वाचेल.

तूळ - धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. वादविवादात सरशी होईल. व्यवसायात विक्री चांगली राहील. घरी पाहुणे येतील. जोडीदार आपल्याला चांगली साथ देईल. तरुण-तरुणींचा विवाह ठरण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू होतील. भावंडांची भेट होईल.

वृश्चिक - मनासारखे भोजन मिळेल. नोकरीत अनुकूल घटना घडतील. एखादे महत्त्वाचे काम अडून राहील. त्यामुळे थोडा मनस्ताप सहन करावा लागेल. संयम सोडू नका. आर्थिक आवक चांगली राहील. पैशाचा ओघ सुरु राहील. प्रवासात सावधगिरी बाळगा.

धनू - तरुण-तरुणींचा विवाह ठरेल. घरात उत्साही वातावरण राहील. मनासारखे भोजन मिळेल. मुलांच्या यशामुळे घरामध्ये उत्साह राहील. काहींना जवळचा प्रवास करावा लागेल. प्रवास कार्य साधक ठरेल. काही अकल्पनीय लाभ होईल. तुमची प्रशंसा होईल.

मकर- सरकारी कामे करताना धावपळ करावी लागेल. वेळ आणि पैसा खर्च होईल. मालमतेच्या कामात यश मिळेल. जोडीदार आपल्याला सांभाळून घेईल. नोकरीत अनुकूल बदल होतील. काहींची नवीन प्रकल्पासाठी निवड होईल. त्यात आपल्याला यश मिळेल.

कुंभ- नेहमीचे काम करताना चांगला अनुभव येईल. सकारात्मक वातावरण राहील. पैशाचा ओघ चांगला राहील. विविध कामे मार्गी लागतील. महत्त्वाचे लोक भेटतील. प्रवास घडेल. प्रवासात दगदग होईल. प्रवासाचे नियोजन नीट करा.

मीन- धनलक्ष्मीची कृपा आपल्यावर राहील. मोठ्या उलाढाली होतील. त्यात फायदा होईल. नोकरीत बढ़ती मिळू शकते. आर्थिक लाभ होतील. जीवनसाथी चांगले सहकार्य करील. महत्त्वाचा निरोप येईल. प्रश्न सुटतील. 

(विजय देशपांडे-ज्योतिष विशारद)

टॅग्स :Astrologyफलज्योतिष