शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य 21 जानेवारी, 2022; अंदाज चुकू शकतात, व्यवसायात नवीन प्रयोग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 07:38 IST

Today's horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...  

मेष- नशिबाची अनुकूलता तुमच्या बाजूने राहील. तुमच्या कामाची प्रशंसा होईल. इतरांना तुमच्याकडून प्रेरणा मिळेल. नोकरीत अनुकूल घटना घडतील. तुमचे वर्चस्व राहील. मुलांच्या प्रगतीच्या बातम्या कळतील. काहींना कामानिमित्त प्रवास घडून येतील.

वृषभ- नोकरीत तुमचे पारडे जड राहील. काहींची बदली होऊ शकते. तर काहींना नवीन प्रकल्पात संधी मिळू शकते. या संधीचे आपण सोने कराल. आर्थिक आवक चांगली राहील. हाती पैसे खुळखुळतील. प्रवासाचे योग येतील. जीवनसाथीच्या कलाने घ्या.

मिथुन- कुटुंबातील सदस्यामध्ये समन्वय राहील. नातेवाइकांच्या भेटी होतील. मुले अभ्यासात प्रगती करतील. व्यवसायात विक्री चांगली होईल. एखाद्या बाबतीत अंदाज चुकू शकतात. जीवनसाथीचे सहकार्य मिळेल. प्रवास कार्य साधक ठरतील.

कर्क- लोकांच्या भेटीगाठी होतील. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. मनासारखे पदार्थ खाण्यास मिळतील. तब्येतीची काळजी घ्या. व्यवसायात भरभराट होईल. आर्थिक प्राप्ती मनासारखी राहील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. मनात आनंदी विचार राहतील.

सिंह- अनुकूल परिस्थिती राहील. ग्रहमानाची साथ राहील. मुलांना योग्य मार्गदर्शन करा. नोकरीत चांगली स्थिती राहील. मनात सकारात्मक विचार राहतील. व्यवसायात नवीन प्रयोग करण्याकडे कल राहील.

कन्या- नोकरीत सहकाऱ्यांना सांभाळून घ्या. किरकोळ वाद वाढवू नका. तुमच्या अनुरूप व्यवहार होतील. मुले प्रगती करतील. खर्च वाढता राहील. त्यामुळे बजेट गोलमाल होईल. महत्वाचे काम पुढे ढकलणे ठीक राहील. प्रवासात अनोळखी व्यक्तीपासून सावध राहा.

तूळ- लोकांची मदत मिळेल. मात्र आपण थोडे संयमाने वागणे गरजेचे आहे. मनात काळजीचे विचार राहतील. मात्र अडचणीतून मार्ग निघेल याची खात्री बाळगा. जाणकारांचा सल्ला घेण्यात कमीपणा समजू नका. घरासाठी वेळ द्यावा लागेल.

वृश्चिक- चांगली परिस्थिती आहे. उत्साहाने कामे करा. यश मिळेल. सरकारी कामे मार्गी लागतील. सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांच्या सहवासात राहा. महत्त्वाच्या व्यक्ती भेटतील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. नोकरीत धावपळ करावी लागेल. थोडे मुत्सद्दीपणाने वागा.

धनू - एखाद्या सार्वजनिक, धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. काहींना प्रवासाचे योग येतील. नातेवाइकांच्या भेटी होतील. लोकांच्या भेटीगाठी होतील. जुन्या गुंतवणुकीचा फायदा होईल. व्यवसायात भरभराट होईल. आर्थिक बाजू बळकट राहील.

मकर- चांगल्या बातम्या कानावर पडतील. त्यामुळे मन प्रसन्न राहील. तणाव निघून जाईल. गृहसौख्य चांगले राहील. प्रवास घडून येतील. लोकांच्या भेटीगाठी होतील. आर्थिक आवक चांगली राहील. आरोग्याची काळजी घ्या. आराम करणे आवश्यक आहे.

कुंभ- मोठ्या उलाढाली होतील. त्यात आपल्याला फायदा होईल. काहींना प्रवासाचे योग येतील. देवदर्शनाची संधी मिळेल. विविध प्रकारचे लाभ होतील. सर्वांचे सहकार्य मिळेल. जीवनसाथीशी सूर जुळतील.

मीन- आर्थिक व्यवहार सांभाळून करा. चटकन कुणावरही विश्वास ठेवू नका. ज्येष्ठांचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. नोकरीत चांगली परिस्थिती राहील. तब्येतीकडे दुर्लक्ष करु नका. इतरांना मदत करण्याच्या नादात स्वत:कडे दुर्लक्ष करू नका.

-विजय देशपांडे (ज्योतिष विशारद)

टॅग्स :Astrologyफलज्योतिष