शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य ३० एप्रिल २०२१; सिंहने कायद्याचे पालन करावे, तूळला नोकरीत संघर्ष अटळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 07:40 IST

Today's horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

मेष- बोलण्याचा प्रभाव पडेल. भाग्याची साथ चांगली राहील. काहीना प्रवास करावा लागेल. हातून धार्मिक कार्य घडेल. व्यवसायात धाडस करू नका. नोकरीत कटू- गोड अनुभव येतील. आर्थिक आवक ठीक राहील. एखादे पुस्तक वाचण्यात आपले मन रमणार आहे.

वृषभ- आरोग्याला जपा. जास्त दगदग होईल. मात्र, आराम करणे आवश्यक आहे. आर्थिक परिस्थिती सामान्य राहील. व्यवसायातील लेखी करारमदार करण्यास हरकत नाही. मुलावर रागावू नका, तब्येतीची काळजी घ्या. सात्त्विक आहार आवश्यक.

मिथुन- प्रगतीचा काळ आहे. सुखसौख्यात वाढ होईल, थोडे आरोग्याला जपणे आवश्यक आहे. नोकरीत थोडे कष्ट पडतील. काही बाबतीत मनस्ताप होऊ शकतो. मुलांना यश मिळेल. त्याचा आपल्याला आनंद राहील. आर्थिक परिस्थिती चांगली राहिल.

कर्क- आर्थिक स्थिती चांगली राहील. आरोग्याला जपणे मात्र आवश्यक आहे. मोठ्याचा सल्ला नक्की घ्या. आरोग्याच्या बाबतीत तज्ज्ञ काय सांगतात ते ऐका. मुलांशी याद घालू नका. त्यांचे काय म्हणणे आहे. ते ऐकून घ्या. मनाला जास्त ताण करून घेऊ नका, नोकरीमध्ये चांगली परिस्थिती असेल.

सिंह- नोकरी धंद्यात चांगले यश मिळेल. मुलांनाही यश मिळेल. भाऊ- बहीण यांच्या भेटी होतील. कायद्याचे पालन करा. वाहन जपून चालवा भाग्याची साथ चांगली राहील. नवीन आर्थिक संधी प्राप्त होतील. प्रवासाचे नियोजन कराल.

कन्या- सुखशांती मिळेल. घरात राहणे होईल. भाग्य चांगले साथ देईल. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. नोकरीत बदली किंवा संघर्ष, अशी परिस्थिती उद्भवू शकते. थोड़ा मनावर ताबा ठेवणे आवश्यक आहे. एखादी समाजसेवा करण्याच्या दृष्टीने किया मित्रांचा 'ग्रुप' बनवण्याच्या दृष्टीने पावले टाकाल.

तूळ- व्यवसायात जास्त धाडस करू नका. आरोग्याला जपा. प्रवास शक्यतो टाळा. वारसाहक्काची कामे पुढे ढकला. जोडीदाराशी मधुर संबंध राहतील. नोकरीत संघर्ष अटळ दिसतो. बेबनाव होण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती चांगली राहील.

वृश्चिक - आरोग्याची काळजी आहार आणि पथ्यपाण्याकडे नीट बघा, वारसाहक्काची कामे करण्यास हरकत नाही. व्यवसायात धाडस नका. नोकरीमध्ये चांगली परिस्थिती राहणार आहे. प्रमोशनदेखील होर शकते. काहींना प्रवास घडेल. आ. आवळ उत्तम राहील.

धनू- मन प्रसन्न राहील. भाऊ बहिणीशी सलोख्याचे संबंध ठेवा. जोडीदाराबरोबर कटू- गोड संबंध राहतील. मुलांना यश मिळेल. त्यांचे यश कुटुंबात साजरे करा. पैशाची आवक चांगली राहील. बरेच दिवसापासून सुप्त असलेली एखादी कला आत्मसात करता येईल काय याची चाचपणी, नियोजन करा,

मकर- थोडा मनस्ताप होण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. प्रवास घडेल. हातून काही धार्मिक कृत्ये घडतील. भावाशी सलोखा राखा. नोकरीमध्ये चांगली परिस्थिती राहील. मुलावर रागावू नका. तब्येतीला जपा. आहार सात्विक व साधाच घेणे आवश्यक आहे. 

कुंभ- आर्थिक भरभराट होईल. नोकरीमध्ये चांगली परिस्थिती असेल. शक्यतो घरीच राहा. प्रवास टाळा. भावंडाशी संपर्क राहील. व्यावसायिकामध्ये चांगली परिस्थिती राहील. मुले खोड्या करतील. त्यांच्यावर लक्ष ठेवा.

मीन- काळ खूप चांगला आहे. नोकरीमध्ये आपली प्रगती होईल; परंतु वाददेखील होतील. बदलदेखील होऊ शकतो. आर्थिक परिस्थिती छान राहील तून पूजापाठ होईल. जोडीदार साथ देईल. व्यवसायात बरकत राहील. अनाहूत काळजी वाटेल.

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष