शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय
3
2016 चौकार...! एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक चौकार लगावणारे ७ फलंदाज, कितव्या क्रमांकावर रोहित आणि विराट?
4
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
5
इंग्लंड दौऱ्यानंतर गंभीर, आगरकरने काढलं संघाबाहेर, त्याच फलंदाजाने कुटल्या १७४ धावा, केली चौकार, षटकारांची बरसात
6
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
7
गुंतवणूकदारांना बंपर भेट! 'ही' आयटी कंपनी देणार प्रति शेअर १३० रुपये लाभांश; रेकॉर्ड डेट कधी? लगेच तपासा
8
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
9
"तो आनंदी होता, आम्ही ४० मिनिटं व्हिडीओ कॉलवर बोलला..."; लेकाच्या मृत्यूने वडिलांना धक्का
10
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
11
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
12
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
13
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
14
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
15
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
16
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
17
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
18
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
19
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
20
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य ३ एप्रिल २०२१; नवीन कार्याचा आरंभ करू नका. स्वास्थ्य बिघडू शकते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 07:06 IST

Daily Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस मिश्र फलदायी राहील. अस्वास्थ्य आणि कटकटीचा अनुभव येईल. शरीरात आळस आणि थकवा जाणवेल तर मन अशांत राहील. आज संताप वाटेल आणि त्यामुळे कामे बिघडतील. व्यवहारात न्याय आणण्याचा प्रयत्न करा. निर्धारीत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. धार्मिक यात्रेचा बेत आखाल. आणखी वाचा.

वृषभ - आजचा दिवस काळजीपूर्वक राहा अशी सूचना श्रीगणेश देत आहेत. नवीन कार्याचा आरंभ करू नका. स्वास्थ्य बिघडू शकते. खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देणे हिताचे ठरेल. शारीरिक थकवा आणि मानसिक व्यथा अनुभवाल. ऑफिसमध्ये कामाचा भार वाढल्याने अधिक थकवा जाणवेल. आणखी वाचा.

मिथुन - दिवस आनंदात आणि भोग विलासात जाईल. भिन्न लिंगीय व्यक्तींशी भेट होईल. मित्र आणि प्रिय व्यक्तींसमवेत मनोरंजनात्मक प्रवास घडेल. वाहनसुख मिळेल. नववस्त्रांची खरेदी होईल व परिधान करण्याची संधी मिळेल. प्रणयासाठी उत्तम दिवस. भोजनात मिष्टान्न मिळेल. तब्बेत चांगली राहील. सामाजिक सम्मान आणि प्रसिद्धी मिळेल. आणखी वाचा.

कर्क - श्रीगणेश सांगतात की आज दिवस चांगला जाईल. घरात शांती आणि आनंदाचे वातावरण राहील. सुखद प्रसंग घडेल. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल. तब्बेत चांगली राहील. कुटुंबीयांसमवेत आनंदात वेळ जाईल. नोकरदारांना नोकरीत लाभ होतील. आणखी वाचा.

सिंह - आजचा दिवस आनंदात जाईल. अधिक कल्पनाशील बनाल. साहित्य नवनिर्मितीमुळे काव्य लेखनाची प्रेरणा मिळेल. आवडत्या व्यक्तीची भेट फलस्वरूप होईल व त्यामुळे दिवसभर मन आनंदी राहील. संततीच्या दृष्टीने प्रगतीच्या वार्ता मिळतील. अभ्यासाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना खूप चांगला दिवस आहे. मित्र भेटतील. आणखी वाचा.

कन्या - आजचा दिवस आपणाला चांगला नाही असे श्रीगणेश सांगतात. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडेल. काही अडचणींमुळे मन दुःखी राहील. स्फूर्तीचा अभाव असेल. स्वकीयांचे गैरसमज होतील. आईची तब्बेत बिघडेल. घर, जमीन इ. कागदपत्रे जपून ठेवा. आणखी वाचा.

तूळ - आजचा दिवस शुभ फलप्राप्तीचा आहे असा संकेत श्रीगणेश देतात. भावंडांशी संबंध चांगले राहतील. त्यांच्याशी घरविषयक प्रश्नांची चर्चा होईल. एखाद्या छोटया धार्मिक ठिकाणी जाण्याचे यशस्वी नियोजन कराल. धनलाभ होईल. परदेशातून चांगल्या वार्ता मिळतील. व्यावहारीक कारणांनी यात्रा कराल. नव्या कामाचा आरंभ करण्यास चांगला दिवस. आणखी वाचा.

वृश्चिक - श्रीगणेशांच्या मते आजचा दिवस साधारणच आहे. नाहक खर्चावर नियंत्रण ठेवा. कुटुंबात वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. कुटुंबातील सदस्यांचे गैरसमज दूर करा. शारीरिक त्रास आणि मनात मरगळ राहील. नकारात्मक विचार करू नका. आणखी वाचा.

धनु - आज धार्मिक प्रवास होईल असे संकेत श्रीगणेश देतात. ठरविलेली कामे पूर्ण होतील. शरीर व मन स्वस्थ असेल ज्यामुळे उत्साही व आनंदी असाल. कुटुंबात मंगल कार्ये ठरतील. आणखी वाचा.

मकर - आज धार्मिक व अध्यात्मिक विषयात रस राहील. त्याच कामात मग्न राहाल. तसेच त्यासाठी खर्च देखील करावा लागेल. कोर्ट कचेरी संबंधी कामे निघतील. व्यावसायिक कामात विघ्न येतील. मित्रांच्या प्रतिष्ठेची हानी होईल. उत्साह आणि प्रसन्नता नाहीशी होईल. आणखी वाचा.

कुंभ - आजचा दिवस फायदयाचा आहे असे श्रीगणेश सांगतात. व्यवसायात आज लाभ होईल. मित्र भेटतील त्यामुळे आनंद होईल. त्यांच्या बरोबर प्रवासही ठरवाल. आणखी वाचा.

मीन- श्रीगणेश सांगतात की आज आपला दिवस शुभफल देणारा जाईल. कामे यशस्वी होतील आणि वरिष्ठ अधिकारी संतुष्ट असतील त्यामुळे आनंदी दिवस जाईल. व्यापार्‍यांच्या व्यापारात वाढ होईल. वडील आणि वाडवडील यांच्याकडून फायदा होईल. लक्ष्मीची कृपा राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्य चांगले राहील. सरकारकडून फायदा होईल. आणखी वाचा.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष