शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२२; धनलाभाची शक्यता, नोकरीत अनुकूल परिस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 07:33 IST

Today Horoscope: कसा असेल आजचा दिवस तुमच्या राशीसाठी वाचा तुमचं राभीभविष्य...

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाथ ५, १९४४. तिथी- चैत्र कृष्ण दशमी (दुसऱ्या दिवशी उत्तर रात्री १.३९ पर्यंत) श्री. शालिवाहन शके १९४४. शुभकृत् नाम संवत्सर, नक्षत्र- संध्याकाळी ५.१३ पर्यंत धनिष्ठा त्यानंतर शततारका. रास- कुंभ, आज - चांगला दिवस. राहू काळ- सकाळी ७.३० ते ९ (राहू काळात महत्वाची कामे टाळा)

मेष- अतिशय अनुकूल परिस्थिती राहील. अचानक धनलाभ होईल. विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. भेटवस्तू मिळतील. महत्वाचे निरोप येतील. महत्वाच्या कामात यश मिळेल. तुमचे महत्व वाढेल. तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल. जीवनसाथीची चांगली साथ राहील. 

वृषभ- नोकरीत अतिशय अनुकूल परिस्थिती राहील. अचानक मोठी संधी चालून येईल. बढतीसाठी प्रयत्न करण्यास हरकत नाही. सुखसोयी वाढवून मिळतील. वाहनसुख मिळेल. घरी पाहुणे येतील. एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. आर्थिक आवक राहील. 

मिथुन- ग्रहमान तुम्हाला फायदे देणारे असेल. भाग्याची चांगली साथ राहील. महत्वाच्या कामात सफलता मिळेल. मानसन्मान, प्रसिद्धी मिळेल. पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास होतील. एखादी मोठी संधी चालून येईल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. लोकांच्या भेटीगाठी होतील. एखादी मोठी संधी चालून येईल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. लोकांच्या भेटीगाठी होतील. 

कर्क- अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. लॉटरीचे एखादे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही. वाहन जपूर चालवा. सकारात्मक विचार राहतील असे प्रयत्न करा. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. तुमचे पारडे जड राहील. तुमचे बोलणे लोकांना पटेल. 

सिंह- महत्वाच्या कामात सफलता मिळेल. जीवनसाथी चांगली साथ देईल. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. भेटवस्तू मिळू शकतात. व्यवसायात विक्री चांगली होईल. भागीदारांचे सहकार्य मिळेल. नोकरीत सर्वांचे सहकार्य मिळेल. 

कन्या- तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. खाण्या-पिण्याची काळजी घ्या. चांगल्या मित्रांच्या संगतीत राहा. कुणावरही लगेच विश्वास ठेवू नका. जीवनसाथीचा सल्ला महत्वाचा ठरेल. नोकरीत सामान्य परिस्थिती राहील. घरात एखाद्या सदस्याशी गैरसमज होतील. 

तूळ- प्रसिद्धी मानसन्मान मिळेल. महत्वाच्या कामात यश मिळेल. महत्वाचे निरोप येतील. हातून मोठे काम घडेल. त्यामुळे वाहवा होईल. जीवनसाथी चांगली साथ देईल. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. 

वृश्चिक- घरात समारंभाचे आयोजन केले जाईल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. नोकरीत प्रगतीला पूरक वातावरण राहील. अनेकांचे सहकार्य मिळेल. नवीन संधी मिळेल. विविध प्रकारचे लाभ होतील. आरोग्याची काळजी घ्या. तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल. 

धनू- नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. मालमत्तेच्या व्यवहारातील गुंतागुंत कमी होईल. भावंडांच्या भेटी होतील. प्रवास कार्य साधक ठरतील. व्यवसायात बरकत राहील. आर्थिक उलाढाली फायदेशीर ठरतील. पैशाची आवक चांगली राहील. आवडत्या छंदासाठी वेळ काढा. 

मकर- धनलक्ष्मीची कृपा आपल्यावर राहील. विविध मार्गांनी पैसे मिळतील. मालमत्तेच्या कामांना गती मिळेल. वारसाहक्काने मिळणाऱ्या संपत्तीत लाभ होईल. मनासारखे भोजन मिळेल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. महत्वाचे काम मार्गी लागेल. 

कुंभ- मन प्रसन्न राहील. ग्रहमानाची अनुकूलता अनुभवायला मिळेल. महत्वाच्या कामात यश मिळेल. अडचणी दूर होतील. नोकरीत तुमचे वर्चस्व राहील. जीवनसाथीशी सूर जुळतील. नात्यात गोडवा राहील. आर्थिक आवक चांगली राहील. 

मीन- चैनीवर खर्च करण्याकडे कल राहील. कुणी तुम्हाला मोहात अडकवण्याचा प्रयत्न करेल. सतर्कपणे व्यवहार करा. महत्वाच्या कामासाठी धावपळ करावी लागेल. योग्य मार्गदर्शन घ्या. प्रवासात गरजेपेक्षा जास्त खर्च होईल. 

- विजय देशपांडे (ज्योतिष विशारद)

टॅग्स :Zodiac Signराशी भविष्य