शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
3
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
4
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
5
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
6
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
7
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
8
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
9
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
10
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
11
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
12
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
13
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
14
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
15
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
16
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
17
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
18
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
19
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
20
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान

Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य - २३ डिसेंबर २०२१; व्यवसायात भरभराट होईल, मालमत्तेच्या कामात गती येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2021 07:35 IST

Todays Horoscope 23 December 2021 : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष – लोकांच्या भेटीगाठी होतील. एखाद्या धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. खाण्यापिण्याची लयलूट राहील. मनावरचा ताण हलका होईल. नोकरीत चांगली परिस्थिती राहील. काही करुन दाखवण्याची संधी मिळेल. मुले प्रगती करतील, मन प्रसन्न राहील.

वृषभ – नोकरीत नेहमीप्रमाणे कामे सुरू राहतील. विशेष काही बदल होणार नाहीत. काही कारणाने फिरावे लागेल. दूरचा प्रवास कारावा लागेल. बोलताना शब्द जरा जपून वापरा. मुलांच्या अडचणी समजून घ्या. विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले पाहिजे असे नाही.

मिथुन – व्यवसायात भरभराट होईल. कामे आटोक्यात येतील. मित्रमंडळींच्या संगतीत वेळ मजेत जाईल. पैशांचा ओघ सुरू राहील. जुनी येणी वसूल होतील. स्थावर मालमत्तेच्या कामांना गती मिळेल. मुलांना वेळ दिला पाहिजे. सामाजिक कार्यात भाग घ्याल.

कर्क – विवाहेच्छुकांचे विवाह ठरण्याच्या दृष्टीने अनुकूल काळ आहे. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. जोडीदाराकडून भेटवस्तू मिळेल. घरात आनंदी वातावरण राहील. खाण्यापिण्याची चंगळ राहील. मुलांचे यश साजरे कराल. काम करण्याची उर्मी राहील.

सिंह – नोकरीत सामान्य परिस्थिती राहील. वरिष्ठांशी बेबनाव होऊ शकतो. थोडे संयामाने वागणे आवश्यक आहे. महत्त्वाचे काम पुढे ढकलता आले तर बरे होईल. त्यामुळे वेळ आणि पैसा वाचेल. मुलांना यश मिळेल. त्यांच्यासाठी वेळ काढा.

कन्या – महत्त्वाच्या बातम्या कानावर पडतील. तुमच्या कर्तुत्वाला वाव मिळेल. पैशांची आवक चांगली राहील. नोकरीत प्रगती होईल. तुमच्या बोलण्यामुळे कामे होतील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. महत्त्वाच्या कामातील अडथळे दूर होतील. 

तूळ – नोकरीत बदलीची शक्यता आहे. तुमच्या आवडीचे काम करताना आनंद मिळेल. प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू राहील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. नातेवाईकांच्या भेटी होतील. त्यामुळे मनावरचा ताण हलका होईल. एखादी चांगली बातमी कळेल. 

वृश्चिक – व्यवसायात भरभराट होईल. मनाला चांगला उठाव राहील. कोणाशीही वाद घालण्यात आपला वेळ वाया घालवू नका. स्वत:च्या प्रगतीवर लक्ष द्या. काळ चांगला आहे. त्याचा फायदा घ्या. आर्थिक लाभ होईल. कामे आटोक्यात येतील.

धनू – जीवनसाथीचे सहकार्य मोलाचे ठरेल. आर्थिक आवक चांगली राहील. बचत करता येईल. महत्त्वाची कामे पुढे ढकलता आली तर बरे. त्यामुळे पैशांचा अपव्यय होणार नाही. फसवणुकीची शक्यता आहे. काहींना प्रवास करावा लागेल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील.

मकर – सकारात्मक वातावरण राहील. जीवनसाथीचे सहकार्य मिळेल. प्रेमाची कबुली देण्यास हरकत नाही. पैशांचा ओघ चांगला राहील. महत्त्वाचे काम करताना खबरदारी घ्या. कामे आटोक्यात येतील. कामाचे दडपण राहणार नाही. एकंदरीत चांगली परिस्थिती राहील. 

कुंभ – आवडत्या छंदासाठी वेळ काढा. एखादे चांगले पुस्तक वाचून हातावेगळे करा. मनात चिंतेला थारा देऊ नका. तब्येतीच्या बाबतीत बेपर्वाई नको. लोकांना जोडून ठेवा. त्यासाठी सकारात्मक विचार करा. महत्त्वाची कामे पुढे ढकलेली बरे.

मीन – नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. काहींना बचतीचे योग आहेत. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. मुलांचे यश साजरे कराल. आर्थिक आवक चांगली राहील. त्यामुळे सढळ हस्ते दुसऱ्यांना मदत कराल.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष