शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य - २२ डिसेंबर २०२१; नोकरीत अनुकूल परिस्थिती, नवी संधी मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 07:32 IST

Todays Horoscope 22 December 2021 : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष – घरात मंगलकार्य ठरण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने हालचाली होतील. एखादा कौटुंबीक कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो. भेटीगाठी होतील. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. नवीन संधी मिळेल. मुलांना अपेक्षित संधी मिळेल. भावंडांचे सहकार्य मिळेल.

वृषभ – काहींना प्रवास घडून येतील. प्रवासात अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. रागाच्या भरात कोणाचाही अपमान करु नका. नोकरीत सामान्य परिस्थितीत राहील. हितशत्रू गुप्तपणे कायवाया करतील. मुलांशी संवाद ठेवा. त्यांना योग्य मार्गदर्शन करा.

मिथुन – आर्थिक आवक चांगली राहील. वडिलोपार्जित संपत्तीची कामे मार्गी लागतील. नवीन घर किंवा शेती खरेदी करण्यासाठी प्रयत्न कराल. व्यवसायात भागीदार चांगले सहकार्य करील. मनासारखे भोजन मिळेल. मुलांच्या अडचणी समजून घ्या.

कर्क – मनात आनंदी विचार राहतील. सकारात्मक दृष्टीकोन असेल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. जीवनसाथीशी नात्यात गोडवा राहील. तरुणवर्गाला प्रेमाक यश मिळेल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. मुलांना अपेक्षित संधी मिळतील, त्यांचे कौतुक होईल.

सिंह – मुलांची प्रगती होईल. जोडीदाराशी वाद घालू नका. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. काही कामे लांबणीवर पडतील. काहींना प्रवास करावा लागेल. प्रवासात दगदग होईल. नोकरीत वाद होतील. खर्चाचे नियोजन करा.

कन्या – आपल्यावर धनलक्ष्मीची कृपा राहील. अनेक मार्गांनी धनप्राप्ती होईल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. अचानक एखादी चांगली बातमी कळेल. चांगली संधी मिळेल. नोकरीत तुमचे वर्चस्व राहील. घरात आनंदी वातावरण राहील. व्यवसायात धाडसी निर्णय घ्याल.

तूळ – नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. नवीन जबाबदारी अंगावर पडेल. त्यात आपल्याला फायदा होईल. काहींची बदली होऊ शकते. कामाचा ताण कमी होईल. घरात उत्साही वातावरण राहील. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. भावंडांच्या भेटीगाठी होतील.

वृश्चिक – नशिबाची अनुकूलता तुमच्या बाजूने राहील. कामाचा ताण कमी होईल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. व्यवसायात विक्री चांगली राहील. वाहन सुख मिळेल. जोडीदाराशी वाद घालू नका. घरात एखाद्या व्यक्तीशी वाद होतील.

धनू – काहींना अचनाक धनलाभ होतील. आर्थिक चिंता राहणार नाही. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. थोडे संयमाने वागणे आवश्यक आहेय अति चिकित्सा करणे टाळा. प्रवास शक्यतो टाळा. प्रवासात दगदग होईल. मनासारखे भोजन मिळेल. जोडीदार चांगली साथ देईल.

मकर – विविध प्रकारच्या कामांना गती मिळेल. अडचणी दूर होतील. मनात आनंदी विचार राहतील. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. जोडीदाराला भेटवस्तू देण्यास हरकत नाही. आर्थिक आवक चांगली राहील. जमिनीचे व्यवहार करताना खबरदारी घ्या.

कुंभ – चांगल्या व्यक्तींची कदर करा. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. दगदगीची कामे टाळा. आराम करण्याची गरज आहे. नोकरी, व्यवसायातील काल्पनिक अडचणींची काळजी करून स्वत:ला त्रास करून घेऊ नका. 

मीन – धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. भेटवस्तू मिळतील. सहकारी मदत करतील. नोकरीत प्रगती होईल. घरात आनंदी वातावरण राहील. मुलांच्या यशामुळे उत्साह वाढेल. तुमच्या दयाळू वृत्तीचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष