शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य ३१ मार्च २०२१; आज अग्नी, पाणी आणि वाहनांच्या दुर्घटनेपासून सावध राहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 07:03 IST

Daily Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष - श्रीगणेशाच्या आशीर्वादाने सुखदायी दांपत्यजीवन, हिंडणे- फिरणे आणि सगळेच मनासारखे मिळण्याचे योग आहेत. आयात- निर्यात व्यापाराशी संबंधितांना लाभ आणि यश मिळेल. हरवलेली वस्तू परत मिळेल. प्रिय व्यक्तीशी प्रेमाचा सुखद अनुभव येईल. प्रवास होईल. आर्थिक लाभ आणि वाहनसुख मिळेल.  आणखी वाचा.

वृषभ - श्रीगणेशाच्या दृष्टीने आजचा दिवस शुभ फलदायी ठरेल. ठरवलेली कामे व्यवस्थीत पार पडतील. अपूर्ण कामे पूर्ण होतील. शारीरिक, मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक लाभ होईल. मातुल घराण्याकडून आनंदाच्या वार्ता मिळतील. आजारापासून सुटका होईल आणखी वाचा.

मिथुन - श्रीगणेश सांगतात की आज संतती आणि जीवनसाथी यांच्या तब्बेतीची काळजी राहील. वादविवाद, चर्चा यात खोलात जाऊ नका. आत्मसन्मान दुखावला जाईल. मैत्रिणींमुळे खर्च आणि नुकसान होण्याची शक्यता आहे. पोटाच्या व्याधींमुळे त्रस्त व्हाल. आणखी वाचा.

कर्क - शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळेल. छातीत दुखणे किंवा अन्य विकारामुळे कुटुंबात अशांतीचे वातावरण राहील. स्त्री वर्गाशी मतभेद वा भांडण होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक जीवनात अपमान झाल्याने दुःख वाटेल. वेळेवर जेवण मिळणार नाही. आणखी वाचा.

सिंह - कार्यात यश आणि प्रतिस्पर्ध्यांवर विजयाची धुंदी आपल्या मनावर राहील. त्यामुळे प्रसन्न वाटेल. भावा- बहिणींबरोबर घरात काही बेत ठरवाल. मित्र, स्नेही यांच्यासोबत यात्रेचे योग आहेत. तब्बेत चांगली राहील. आर्थिक लाभ आणि प्रिय व्यक्तीची भेट यामुळे खुश राहाल. आणखी वाचा.

कन्या - कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. गोड वाणी आणि न्यायप्रिय व्यवहार यामुळे लोकप्रियता मिळेल. आर्थिक लाभ होतील. मिष्टान्न भोजन मिळेल. विद्यार्जनासाठी विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे. हौस- मौज यांवर खर्च होईल. आणखी वाचा.

तूळ - आपले कलाकौशल्य व्यक्त करण्यास सुवर्णसंधी आहे असे श्रीगणेश सांगतात आपली कलात्मक आणि रचनात्मक शक्ती तेजस्वी बनेल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य राहील. मनोरंजन कार्यक्रमात मित्र आणि परिवारासह सहभागी व्हाल. आर्थिक लाभ होईल. स्वादिष्ट भोजन, वस्त्र आणि वाहन सुख मिळेल. आणखी वाचा.

वृश्चिक - श्रीगणेश सांगतात की, मनोरंजन, आनंद यासाठी पैसा खर्च होईल. चिंता व शारीरिक कष्ट यामुळे त्रासून जाल. अपघात व डॉक्टरी चिकित्सा यापासून सांभाळून राहा. गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. स्वभाव रागीट बनेल म्हणून भांडणापासून दूर राहा. संबंधितांबरोबर काही वाईट प्रसंग घडू शकतात. मानहानी- धनहानी होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा.

धनु - आर्थिक, सामाजीक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी आहे असे श्रीगणेश सांगतात. गृहस्थजीवनात पूर्णतः आनंद मिळेल. प्रेमाचा सुखद अनुभव येईल. मित्रांसोबत एखाद्या रम्य स्थळी फिरायला जावू शकाल. जीवनसाथीचा शोध घेणार्‍यांना विवाह योग आहेत. मुलगा व पत्नी यांचेकडून लाभ होईल. व्यापारात फायदा होईल आणि उत्पन्न वाढेल. आणखी वाचा.

मकर - श्रीगणेश म्हणात की आजचा दिवस संघर्षपूर्ण राहील. आज अग्नी, पाणी आणि वाहनांच्या दुर्घटनेपासून सावध राहा. व्यापारामुळे कार्यमग्न राहाल. व्यापारानिमित्त प्रवास करावा लागेल व त्याचा फायदा होईल. वरिष्ठांची मर्जी राहील. नोकरीत बढती मिळेल. संततीच्या शिक्षणाविषयी समाधान वाटेल. आणखी वाचा.

कुंभ - श्रीगणेशांच्या मते आजचा दिवस मिश्रफलप्राप्तीचा. तब्बेत यथा- तथाच राहील. तरीही मनस्वास्थ्य चांगले राहील. कामाचा उत्साह कमी होईल. अधिकार्‍यांशी सांभाळून राहणे हिताचे. अकारण खर्च वाढेल. आनंद- सोहळा, प्रवास- पर्यटन यांवर पैसा खर्च होईल. प्रवास व सहलीची शक्यता आहे. आणखी वाचा.

मीन- आजचा आपला दिवस मध्यम फळ देणारा जाईल असे श्रीगणेश सांगतात. मानसिक, शारीरिक कष्ट अधिक होतील. अचानक धनलाभाचे योग. व्यापारी वर्गाला जुनी येणी वसूल होतील व पैसा मिळेल. तब्बेतीची काळजी घ्या. खर्चावर आवर घाला. आणखी वाचा.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष