शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

राशीभविष्य - ७ ऑक्टोबर 2020, अतिशय रोमांचक व आनंददायी दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 20:59 IST

जाणून घ्या कसा असेल तुमचा दिवस

मेष - शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले असेल. कुटुंबातील सदस्यांबरोबर सुंदर भोजन करणे तसेच आनंदात वेळ घालवणे याचा योग येईल. आर्थिक बाबतीत भविष्या साठी चांगले प्लेनिंग करू शकाल. लक्ष्मीदेवीच्या कृपेने मिळकतीत वाढ होईल. कलाकार, कारागिर यांना त्यांच्या कलेचे प्रदर्शन करण्याची संधी मिळेल आणि त्याची कदरही केली जाईल. आणखी वाचा

वृषभ - आजचा दिवस उत्साही आणि प्रसन्नतापूर्ण राहील. स्वास्थ्य चांगले असल्याने सुख आणि आनंद अनुभवाल. सगे-संबंधी किंवा मित्र यांच्याकडून उपहार मिळतील. प्रवास आणि स्वादिष्ट भोजन दिवस आणखीच आनंदी बनवतील. आर्थिक फायदा संभवतो. आणखी वाचा

मिथुन - श्रीगणेशजी म्हणतात की संयमशील व विचारपूर्ण वर्तन आज तुम्हाला खूप अनिष्ट गोष्टीपासून वाचवील. आपल्या बोलाचालीतून गैरसमज पैदा होतील. शारीरिक कष्ट मनाला अस्वस्थ बनवतील. कुटुंबात दुःखीकष्टी वातावरण राहील. डोळ्यांना पीडा होईल. खर्च जास्त होईल. आणखी वाचा

कर्क - अचानक धनप्राप्ती तसेच वेगवेगळे फायदे पाहता आजचा आपला दिवस अतिशय रोमांचक व आनंददायी जाईल असे श्रीगणेश सांगतात. मिळकतीत वाढ होईल. व्यापार्‍यांशी फायद्याचे सौदे होतील. मुलगा व पत्नी यांच्याकडून लाभ होईल. प्रवास, पर्यटन, तसेच विवाहोत्सुक व्यक्तींना विवाह योग आहे. आणखी वाचा

सिंह - श्रीगणेश म्हणतात की तुमच्या कामात उशीरा यश मिळेल. ऑफिस किंवा घरात जबाबदार्‍यांचे ओझे वाढेल. जीवनात अधिक गंभीरतेचा अनुभव होईल. नवीन संबंध स्थापित करणे किंवा कामासंबंधी महत्त्वाचा निर्णय घेणे हे टाळा असा सल्ला श्रीगणेश देतात. आणखी वाचा

कन्या - शरीरात थकवा, आळस आणि चिंता अनुभवास येतील. संतती बरोबर मतभेद होतील. त्यांच्या स्वास्थ्याची चिंता सतावेल. ऑफिसात वरिष्ठांबरोबर आपला वाद होईल. राजनैतिक संकटांचा सामना करावा लागेल. धार्मिक कार्य किंवा धार्मिक यात्रा यासाठी पैसा खर्च होईल. आणखी वाचा

तूळ – आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, कटू शब्द किंवा वाईट वर्तनामुळे वाद होतील. राग आणि कामवृत्तीवर संयम आवश्यक असेल. हितशत्रू अधिक प्रवृत्त होतील. अचानक धनलाभाची शक्यता, वेळेवर जेवण करण्यास उशीर, जास्त खर्च केल्याने तुमचे मन अस्वस्थ होईल. गणेशानुसार स्त्रिया आणि जलाशयांपासून दूर राहणे फायद्याचे आहे.

वृश्चिक - श्रीगणेशांच्या आशीर्वादाने नोकरी धंदा आणि व्यवसाय क्षेत्र यातून आज आपल्याला भरपूर लाभ होणार आहे. तसेच मित्र, थोर मंडळी, सगेसोयरे यांच्याकडून ही लाभ होईल. सामाजिक समारोह, पर्यटन यासारख्या ठिकाणी जाल. आपण आनंदी राहाल. मिळकत वाढेल. अविवाहितासाठी विवाह योग आहेत. आणखी वाचा

धनु - श्रीगणेश सांगतात की, आर्थिक आणि व्यावापारिक नियोजन करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. कार्ये यशस्वी होतील. परोपकाराची भावना आज बलवत्तर राहील. आनंदात आजचा दिवस व्यतित होईल. नोकरी व्यवसायात उन्नती आणि मानसन्मान प्राप्त होईल. आणखी वाचा

मकर - श्रीगणेश म्हणतात की, आजचा आपला दिवस मिश्र फलदायी आहे. बौद्धिक कामे आणि व्यवसायात आज नवी विचार प्रणाली अमलात आणाल. लेखन आणि साहित्य क्षेत्रात तुमची सृजनात्मकता दिसेल. तरीही मनाच्या एका कोपर्‍यात अस्वस्थता जाणवेल. परिणाम असा होईल की त्यामुळे शारीरिक थकवा आणि ऊबग वाटेल. संततीच्या प्रश्नासंबंधी चिंता निर्माण होईल. उच्च पदस्थ तसेच प्रतिस्पर्धी यांच्याबरोबर चर्चेत भाग घेऊ नका. आणखी वाचा

कुंभ - नकारात्मक विचारांनी मन हताश होईल. आज उद्वेग आणि क्रोध तुमच्या मनात जागा होईल. खर्च वाढेल. बोलण्यावर संयम न राहिल्याने घरात मतभेद व भांडणे होतील. स्वास्थ्य खराब होईल. दुर्घटनेपासून स्वतःला सांभाळा. आणखी वाचा

मीन - श्रीगणेशांच्या आशीर्वादाने आजचा दिवस सुख शांतीत जाईल. व्यापार्‍यांना भागीदारीसाठी उत्तम वेळ आहे. पति-पत्नी मध्ये दाम्पत्यजीवनात निकटता येईल. मित्र, स्वजन यांच्या बरोबर भेटी होतील. रोमांस वाढेल. सार्वजनिक जीवनात प्रगती होईल. आणखी वाचा

टॅग्स :Astrologyफलज्योतिष