शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
2
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
3
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
4
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
5
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
6
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
7
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
8
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
9
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
10
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात
11
लेडीज डब्यामध्ये प्रवाशाकडे बाळ देऊन महिला पसार; सीवूड स्थानकातील घटना; पोलिसांकडून तपास सुरू
12
‘न्यू इंडिया’ सप्टेंबरपर्यंत सारस्वतमध्ये विलीन; ठेवीदारांच्या व्यापक हितासाठी निर्णय : ठाकूर
13
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
14
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
15
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
16
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
17
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
18
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
19
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
20
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले

राशीभविष्य - २४ ऑक्टोबर २०२०: उदासीन वृत्ती अन् संशयाचे काळे ढग आपल्या मनाला वेढून टाकतील

By मुकेश चव्हाण | Updated: October 23, 2020 22:00 IST

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष - घर, कुटुंब आणि संतती यांच्या संबंधी आज आपणाला आनंद आणि संतोषाची भावना राहील. आज आप्त, इष्ट आणइ मित्र आपणाला घेरून टाकतील. व्यापार- धंदयासंबंधी प्रवास होईल आणि त्यात लाभ होईल. व्यवसायात लाभ, मान आणइ प्रतिष्ठा मिळेल. आणखी वाचा

वृषभ - व्यापार्‍यांसाठी आजचा दिवस शुभ आहे. नवीन आयोजन ते हाती घेऊ शकतील. आर्थिक लाभ प्राप्त होतील. विदेशातील मित्र किंवा नातेवाईक यांच्याकडून येणार्‍या वार्ता आपणाला भावविवश बनवतील. आणखी वाचा 

मिथुन - अनियंत्रित रागाला लगाम घालण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. बदनामी आणि निषेधार्ह विचारांपासून दूर राहणे हिताचे ठरेल. खर्च अधिक झाल्याने आर्थिक चणचण भासेल. कुटुंबातील व्यक्ती आणि ऑफिसातील सहकारी यांच्याशी मतभेद किंवा वादविवादाचे प्रसंगे येतील. त्यामुळे मन सुन्न राहील. आणखी वाचा 

कर्क - आजचा दिवस सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रांत आपणाला लाभदायक ठरेल. मौजमजेची साधने, उत्तम दागीने आणि वाहन खरेदी होईल. मौजमस्ती आणि मनोरंजनात वेळ खर्च होईल. तसेच भिन्न लिंगीय व्यक्तींशी रोमांचक मुलाखात तुम्हाला सुख देईल. आणखी वाचा 

सिंह - श्रीगणेश सांगतात की उदासीन वृत्ती आणि संशयाचे काळे ढग आपल्या मनाला वेढून टाकतील. त्यामुळे मनःस्वास्थ्य लाभणार नाही. तरीही घरात शांततेचे वातावरण राहील.  आणखी वाचा 

कन्या - चिंता आणि उद्विग्नपूर्ण असणारा आजचा दिवस या ना त्या कारणाने काळजी वाढवेल. विशेषतः संतती आणि तब्बेती विषयक जास्त चिंता वाटेल. पोटाच्या तक्रारी राहतील.  आणखी वाचा 

तूळ – श्रीगणेश सांगतात की, आईशी असलेले नाते बिघडू शकते. तसेच आईच्या आरोग्याबाबत चिंता असू शकते. प्रवासासाठी चांगली वेळ नाही. 

वृश्चिक - कार्यात यश, आर्थिक लाभ आणि भाग्योदयासाठी दिवस शुभ आहे. नवीन कार्याचा आरंभ करू शकता. भावंडांशी अधिक सहयोगपूर्ण आणि प्रेमाचे संबंध राहतील.  आणखी वाचा 

धनु - द्विधा मनःस्थिती आणि घरातील बिघडलेले वातावरण यामुळे त्रास होईल. नाहक खर्च होईल. कामे पूर्ण व्हायला विलंब लागेल. महत्त्वाचे निर्णय घेणे हिताचे ठरणार नाही असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा 

मकर - ईश्वर नामस्मरणाने दिवसाचा शुभारंभ होईल. धार्मिक कार्य, पूजा- पाठ होईल. गृहस्थी जीवनात आनंदी वातावरण राहील. आपले प्रत्येक काम सहजगत्या पूर्ण होईल. आणखी वाचा 

कुंभ - कोणाला जामीन राहणे, पैसे देणे- घेणे करू नका असे श्रीगणेश सांगतात. खर्च वाढेल. तब्बेतीकडे लक्ष द्या. कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता.  आणखी वाचा 

मीन -  श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस लाभदायक आहे. नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल. वडीलधारे आणि मित्रांकडून लाभ होईल. नवे मित्र मिळतील. आणखी वाचा 

 

 

 

 

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष