शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२१: कुंभ राशीतील व्यक्तींचे बोलण्यावर ताबा नसल्याने कुटुंबीयांशी मतभेद होऊ शकतात; निरर्थक खर्च करु नका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 07:56 IST

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष - आज दिवसभर प्रतिकूलतेचा सामना करावा लागेल असे श्रीगणेश म्हणतात. शारीरिक व मानसिक अस्वस्थता अनुभवाल. विनाकारण खर्च वाढतील. आणखी वाचा

वृषभ - श्रीगणेश म्हणतात की आजचा दिवस आनंदाचा आहे. व्यापार आणि आवक वाढणे यावर लक्ष्मीची कृपा राहील. कुटुंबीय व मित्र यांच्याबरोबर आनंदी वातावरण राहील. आणखी वाचा

मिथुन -  शरीर व मनाने दिवसभर प्रसन्नता राहील. व्यवसायात प्रशंसा झाल्याने कामातील उत्साह वाढेल. सहकार्‍यांकडून सहकार्य मिळेल. समाजात मान- सन्मान प्राप्त होईल. आणखी वाचा

कर्क - भाग्यात वृद्धी करणारा आजचा दिवस आहे असे श्रीगणेश सांगतात. परदेशातून शुभ समाचार मिळतील. धार्मिक यात्रा किंवा छोटा प्रवास यामुळे प्रसन्नता वाढेल. आणखी वाचा

सिंह -  आज तब्येतीकडे विशेष लक्ष द्यावे. त्यासाठी पैसाही खर्च होऊ शकतो. आज घरचेच खाणे पीणे ठेवा. ते अधिक फायदेशीर होईल. नकारात्मक विचार मनात राहतील, ते दूर करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात.  आणखी वाचा

कन्या -  आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. यश, कीर्ती सहजपणे प्राप्त होतील. व्यापार धंद्यात भागीदारा बरोबरचे संबंध सकारात्मक राहतील. वस्त्र, आभुषणे खरेदी केल्याने खुशीत असाल. आणखी वाचा

तूळ –   श्रीगणेश सांगतात की आज तुमचे स्वास्थ्य चांगले राहील. व्यापारात लाभ होईल. सहकार्‍यांचे सहकार्य मिळेल. परिवारासोबत वेळ आनंदात घालवू शकाल. बोलण्यावर ताबा ठेवा. आणखी वाचा

वृश्चिक - वाद विवादात अडकू नका असे श्रीगणेश सांगतात. संतती विषयी चिंता लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळाल्याने त्यांचा उत्साह अधिकच वाढेल. शेअर्स व सट्टा यात धन खर्चू नका असा श्रीगणेश सल्ला देतात. आणखी वाचा

धनु - आज मन अनुत्साही असल्यामुळे मनात अशांती असेल. कुटुंबात वातावरण क्लेशदायक असेल. कुटुंबीयांशी मतभेद होऊ शकतात. स्थावर मिळकतीचे व्यवहार करताना जपून करावेत. आणखी वाचा

मकर -  मित्र- परिवारासोबत आजचा दिवस आनंदात जाईल. एखाद्या पर्यटन स्थळाला भेट द्याल. स्थावर मिळकती संबंधीची कामे आज करू शकाल. व्यवसाय करणार्‍यांना अनुकूल दिवस. आणखी वाचा

कुंभ-  मानसिकदृष्ट्या द्विधा मनःस्थिती असल्याने निर्णय घ्यायला त्रास पडेल. निरर्थक खर्च होऊ देऊ नका. बोलण्यावर ताबा नसल्याने कुटुंबीयांशी मतभेद होऊ शकतात. आणखी वाचा

मीन- शारीरिक व मानसिक स्वास्थ्य प्रसन्नतापूर्ण असेल. वातावरण उत्साहपूर्ण असल्याने नवीन कामे सुरू करण्याची प्रेरणा मिळेल. कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल. आणखी वाचा

टॅग्स :Astrologyफलज्योतिष