शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

राशीभविष्य - ७ मे २०२१: गुंतवणूक करताना सावध राहा; मीन राशीतील व्यक्तींना सावधानतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 07:19 IST

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष - आज आपणावर लक्ष्मीची कृपादृश्टी राहील असे गणेशजी सांगतात. विवाहोत्सुकांना योग्य जोडीदार मिळण्याचे योग आहेत. सामाजिक क्षेत्रात यश व प्रसिद्धि मिळेल. व्यापारात लाभ होतील. आणखी वाचा

वृषभ -सर्व प्रकारच्या मानसिक तणावापासून मुक्त व्हाल व गणेशजींचा आशीर्वाद आपणाला आहे. तब्बेतही छान राहील. कौटुंबिक जीवनात सुख- समाधानचा अनुभव घ्याल. व्यवसाय धंद्यात यश मिळेल. आणखी वाचा

मिथुन -  संमिश्र फलदायी दिवस जाईल असे गणेशजी सांगतात. तब्बेतीत चढ-उतार होतील. व्यवसाय- नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी नाखूष राहतील, त्यामुळे त्रास होईल. खर्च वाढेल. आणखी वाचा

कर्क - आज मन शांत आणि आनंदी राहण्यासाठी ईश्वराचा नाम जप आणि आध्यात्मिक वाचन हाच एकमेव उपाय असल्याचे गणेशजी सांगतात. रागाला आवर घाला. अनैतिक कृत्ये आणि नकारात्मक विचारापासून दूर राहा. पैशाची चणचण भासेल. आणखी वाचा

सिंह - आरोग्याच्या दृष्टीने आज आपण प्रसन्न व आनंदित राहाल. मित्र आणि संबंधितांसोबत हिंडण्या- फिरण्याचा बेत आखून आनंददायी प्रवासही कराल. सामाजिक सन्मान मिळेल. भागीदारांबरोबर सकारात्मक चर्चा होईल. आणखी वाचा

कन्या - स्वभावात जरा जास्त संवेदनशीलता राहील. कार्य सफल झाल्याने चित्तवृत्ती प्रफुल्लित राहतील. यश आणि कीर्ती वाढेल. माहेरहून चांगल्या बातम्या मिळतील. शारीरिक व मानसिक दृष्ट्या प्रसन्नता जाणवेल. आणखी वाचा

तूळ – आपण बौद्धिक शक्तीमुळे लेखन वा अन्य सृजनकार्य करण्यात आघाडीवर असाल असे श्रीगणेश सांगतात. विचारात सातत्यपूर्ण बदल झाल्याने मानसिक स्वास्थ्य लाभणार नाही. सबब यात्रा- प्रवास टाळावा. अचानक खर्च उद्भवतील. आणखी वाचा

वृश्चिक - आजचा दिवस विद्यार्थ्यांना अनुकूल आहे असे श्रीगणेश सांगतात. स्वभावातील हट्टीपणा सोडून वागल्याने अनेक समस्या सुटतील. नवी वस्त्रे, अलंकार व सौंदर्य प्रसाधने यांवर जास्त खर्च होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

धनु -शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील असे श्रीगणेश सूचित करतात. घरातील सदस्यांसह प्रवास- पर्यटन कराल. मित्र आणि स्वकीयांसोबत वेळेचा सदुपयोग आनंदपूर्वक होईल. आणखी वाचा

मकर - श्रीगणेशांचा सल्ला आहे की अधिक वाद-विवाद न करणे आपल्या हिताचे आहे. धार्मिक कार्य आणि उपासनेसाठी पैसा खर्च होईल. कुटुंबीयांशी मतभेद होऊ नयेत यासाठी वाणीवर नियंत्रण ठेवा. आणखी वाचा

कुंभ -आज प्रापंचिक बाबीं ऐवजी आध्यात्मिक विषयांकडे आपला जास्त कल राहील. नकारात्मक भावनेला महत्त्व न देता. मानसिक स्वास्थ्य मिळविण्याचा प्रयत्न करा. आणखी वाचा

मीन -  पैशाची देवाण- घेवाण, जुनी येणी तसेच गुंतवणूक करताना सावध राहा. असा संकेत श्रीगणेश देत आहेत. इतरांच्या कामांत व्यत्यय आणू नका. कोर्ट- कचेरी प्रकरणात जपून राहा. वाणी आणि संतापावर नियंत्रण ठेवा. आणखी वाचा

टॅग्स :Astrologyफलज्योतिष