शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

राशीभविष्य - ४ मे २०२२: महत्वाचे काम सायंकाळच्या आत पूर्ण करा, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 07:19 IST

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष- खाण्या-पिण्याची चंगळ राहील. आरामात कामे कराल. कामाचा व्याप असला तरी नियोजनपूर्वक कामाची आखणी केल्यास कामे आटोक्यात येतील. आर्थिक आवक चांगली राहील. नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील. भावंडांशी सख्य राहील. फिरणे होईल.

वृषभ- ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील. मनावर ताण राहणार नाही. धनप्राप्तीच्या दृष्टीने चांगला काळ आहे. मनासारखे भोजन मिळेल. नोकरीत थोडा ताण राहील. सहकारी सत्वपरीक्षा पाहतील. पण आपण परिस्थिती मुत्सद्दीपणाने हाताळाल.

मिथुन – महत्त्वाच्या कामांना सूर्यास्तानंतर गती मिळेल. तोपर्यंत कामाचे नियोजन नीट करून ठेवा. अडचणी दूर होतील. मनात आनंदी विचार राहतील. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. घरासाठी चैनीच्या वस्तू खरेदी कराल. अनोळखी लोकांशी सावधपणे व्यवहार करा.

कर्क- महत्वाचे काम सायंकाळच्या आत पूर्ण करा. अन्यथा कामांना विलंब होईल. आर्थिक आवक चांगली राहील. जुनी येणी वसूल होतील. प्रवासाचा योग आहे. नीट नियोजन करून प्रवास करा. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. जीवनसाथीशी मधुर संभाषण करा.

सिंह- ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील. प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू राहील. नोकरीत नवीन जबाबदारी अंगावर पडेल. आर्थिक बाजू बळकट राहील. विविध प्रकारचे लाभ होतील. रागावर नियंत्रण ठेवा.

कन्या- नशिबाची साथ मिळेल. प्रवासाचे योग येतील. प्रवास कार्य साधक राहील. प्रसिद्धी, नावलौकीक वाढवणाऱ्या घटना घडतील. मुलांशी वादविवाद टाळणे योग्य ठरेल. नोकरीत बदल होईल. जर आपण नवीन नोकरीच्या शोधात असाल तर संधी मिळेल.

तूळ- ग्रहमानाची समिश्रता अनुभवायला मिळेल. महत्त्वाची कामे सायंकाळी हाती घ्या. दिवसा कामांची पूर्वतयारी करून नियोजनबद्ध पद्धतीने कामे करा. काहींचे प्रवासाचे बेत ठरतील. दगदग होईल अशी कामे करू नका. मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील.

वृश्चिक- नोकरीत साधक-बाधक परिस्थिती राहील. व्यवसायात भागीदारीचे सहकार्य मिळेल. जीवनसाथी चांगली साथ देईल. महत्त्वाचे काम सायंकाळच्या आत पूर्ण करा. प्रवासात दगदग होईल. आरोग्याची काळजी घ्या. मुले प्रगती करतील.

धनू- नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. कामाचा ताण कमी होईल. विविध प्रकारच्या सोयीसुविधा मिळतील. व्यवसायात धाडसी निर्णय घेतले जातील. आरोग्याची काळजी घ्या. महत्त्वाचे काम सायंकाळच्या सुमारास हाती घ्या. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील.

मकर- सामान्य दिवस राहील. नोकरीत काही कटू तर काही गोड अनुभव येतील. एखाद्या सहकाऱ्याचे वागणे थोडे चमत्कारिक वाटेल. आर्थिक बाजू बळकट राहील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. व्यवसायात बरकत राहील. आरोग्याची काळजी घ्या.

कुंभ- आर्थिक आवक चांगली राहील. एखाद्या व्यवहारात मोठी प्राप्ती होईल. मात्र देवाण-घेवाण करताना खबरदारी घ्या. घरी पाहुणे येतील. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. मुले प्रगती करतील. त्यांचे हट्ट पुरवावे लागतील. नोकरीत बदल होतील.

मीन- नोकरीत अनुकूल बदल होतील. नवीन जबाबदारी घ्यावी लागेल. जोडीदार चांगली साथ देईल. व्यवसायात विक्री चांगली होईल. फार मोठी गुंतवणूक करताना जाणकारांचा सल्ला घ्या. कामानिमित्त प्रवास होतील.

-विजय देशपांडे (ज्योतिष विशारद)

टॅग्स :Astrologyफलज्योतिष