शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

राशीभविष्य - ३ मे २०२२: घर, शेती यांच्या व्यवहारात यश मिळेल; नवीन संधीचा फायदा घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 07:18 IST

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष- धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. योग्य व्यक्तीच्या मार्गदर्शनामुळे फायदा होईल. महत्त्वाचे काम मार्गी लागेल. घर, शेती यांच्या व्यवहारात यश मिळेल. आपले अंदाज बरोबर ठरतील. मित्र, जवळचे लोक यांच्या सहवासात वेळ मजेत जाईल.

वृषभ- मन प्रसन्न राहील. खुल्या दिलाने कामे कराल. सर्वांचे सहकार्य मिळेल. एखादा महत्त्वाचा निरोप कळेल. विरोधक करणारे नरमतील. नोकरी, व्यवसायात स्पर्धा राहील. धनलक्ष्मीची कृपा आपल्यावर राहील. घरात किरकोळ कारणावरून कुरबुर होईल.

मिथुन – नोकरी व्यवसायात प्रगती होईल. काहींना चांगली संधी मिळेल. गरजेपुरते पैसे मिळतील. मौजमजा करण्यासाठी वेळ द्याल. जवळचा प्रवास होईल. महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. लोकांशी बोलताना काळजी घ्या. कुणी दुखावले जाणार नाही हे बघा

कर्क- अनुकूल परिस्थिती राहील. आर्थिक आवक चांगली राहील. विविध मार्गाने पैसे मिळतील. पर्यटनाच्या निमित्ताने फिरणे होईल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. जवळच्या लोकांशी फोनवरून तरी संपर्कात राहा. नोकरीत थोडे संयमाने वागणे आवश्यक आहे.

सिंह- घरात उत्सवी वातावरण राहील. एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. लोकांची ये-जा राहील. नोकरीत प्रगती होईल. नवीन प्रकल्प हाती घेतला जाईल. कामाचा ताण राहील. मात्र आपण नीट नियोजन केले तर चांगले राहील.

कन्या- धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. अनुकूल घटना घडतील. काहींना प्रवास करावा लागेल. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. जोडीदार चांगली साथ देईल. प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू राहील. एखादी चांगली बातमी कानावर पडेल.

तूळ- धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील. एखाद्या सौद्यात मोठा फायदा होऊ शकतो. प्रवासात दगदग, धावपळ होईल. महत्त्वाचे काम पुढे ढकलणे इष्ट ठरेल. जीवनसाथीला नाराज करू नका. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. आवश्यक तेवढा आराम करा.

वृश्चिक- संमिश्र ग्रहमान राहील. नोकरीत जास्तीचे काम करावे लागेल. घरात किरकोळ कारणावरून कुरबुर होईल. जोडीदाराच्या भावनेची कदर केली पाहिजे. इतरांच्या टिकाटिपणीकडे लक्ष न देता आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करावे. मुलांचे हट्ट पुरवावे लागतील.

धनू- नोकरीत प्रगतीला पोषक वातावरण राहील. नवीन संधीचा फायदा घ्या. आर्थिक स्तर उंचावण्यासाठी केलेले प्रयत्न फलदूप होतील. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. महत्त्वाचे काम पुढे ढकलणे योग्य राहील. घरात महत्त्वाचा निर्णय घेताना सर्वांशी चर्चा करा.

मकर- एखाद्या कार्यक्रमात भाग द्याल. तुमची प्रशंसा होईल. व्यवसायात चांगली परिस्थिती राहील. एखाद्या सौद्यातून हाती पैसा येईल. मालमत्तेच्या कामांना गती मिळेल. नातेवाईकांच्या संपर्कात राहाल. मुले प्रगती करतील. नोकरीत सहकाऱ्यांशी विसंवाद राहील.

कुंभ- नोकरीत कामाचे स्वरुप बदलेल. नोकरीच्या शोधात असाल तर संधी मिळेल. नातेवाईकाच्या भेटीगाठी होतील. मनासारखे भोजन मिळेल. सकारात्मक विचार राहतील असे प्रयत्न करा. आवडत्या छंदासाठी वेळ काढा

मीन- मन प्रसन्न राहील. चांगल्या बातम्या कानावर पडतील. मुले अभ्यासात प्रगती करतील. नातेवाईक, स्नेहीजनांशी बोलणे होईल. तुम्ही दिलेला परखड सल्ला इतरांना उपयुक्त ठरेल. जोडीदाराला भेटवस्तू देण्यास हरकत नाही.

-विजय देशपांडे (ज्योतिष विशारद)

टॅग्स :Astrologyफलज्योतिष