शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
4
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
5
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
6
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
7
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
8
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
9
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू
10
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
11
Rahul Gandhi: "मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
12
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
13
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
14
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
15
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
16
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
17
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
19
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
20
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर

राशीभविष्य - २ मे २०२२: धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ; मनासारखी धनप्राप्ती होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 07:29 IST

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष- आर्थिक बाजू बळकट राहील. विचारपूर्वक गुंतवणूक करावी. कायदेविषयक सल्ला मिळेल. मौजमजा करण्याकडे कल राहील. महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. जीवनसाथीशी वाद टाळणे योग्य ठरेल. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल.

वृषभ- महत्त्वाच्या कामात यश मिळेल. किरकोश कारणावरून निर्माण झालेल्या अडचणी दूर होतील. मनात आनंदी विचार राहतील. नोकरीत संघर्ष करावा लागेल. घरात खेळीमेळीचे वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा. आर्थिक आवक चांगली राहील.

मिथुन- नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. तुमचे पारडे जड राहील. विविध सुखसुविधा मिळतील. कामानिमित्त प्रवास घडून येतील. एखाद्या महत्त्वाच्या कामात विलंब होईल. एखाद्या विचित्र व्यक्तींशी व्यवहार घडेल. थोडे संयमाने वागणे आवश्यक आहे.

कर्क- धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. मनासारखी धनप्राप्ती होईल. विविध प्रकारचे लाभ होतील. भेटवस्तू मिळतील. चांगल्या प्रवासाचे योग येतील. नोकरीत साधक बाधक परिस्थिती राहील. गृहसौख्य चांगले राहील. मुलांना रागावणे टाळा.

सिंह- नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. काही बदल होतील. कामाचा व्याप सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागेल. घरी पाहुण्या रावळ्यांचा राबता राहील. इतरांना मदत करण्यासाठी वेळ घ्यावा लागेल. वेळेचे नियोजन नीट करा.

कन्या- भाग्याची चांगली साथ राहील. पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास होईल. प्रवासात थोडी काळजी घ्या. प्रवासाचे नीट नियोजन करा. वाहन जपून चालवा. जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल. खाण्या पिण्याची काळजी घ्या. आर्थिक आवक चांगली राहील.

तूळ- दगदग होईल अशी कामे करू नका. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. काहींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या भावनांची कदर करा. थोडे सबुरीचे धोरण ठेवा. प्रवास शक्यतो टाळा. आरोग्याची काळजी घ्या. आहाराचे तंत्र सांभाळा

वृश्चिक- नोकरीत कामाचा ताण वाढेल. वरिष्ठांशी मतभेद होतील. घरात तणावाचे वातावरण राहील. जीवनसाथीच्या कलेने घ्या. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. एखादी अपेक्षित बातमी कळेल. हितशत्रूंकडे दुर्लक्ष करून आपली वाटचाल सुरू ठेवा.

धनू- नोकरीत चांगली स्थिती राहील. तुमचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. एखादे मोठे पद मिळू शकते. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. काळजी घ्या. महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. मुलांच्या मनात काय आहे हे लक्षात घ्या

मकर- आर्थिक आवक चांगली राहील. मोठ्या उलाढाली फायदेशीर ठरतील. जमीन खरेदी कराल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. जुन्या उखाळ्या पाखाळ्या काढण्यात वेळ दवडू नका. नोकरीत वादाचे प्रसंग येतील. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल.

कुंभ- मनात संघर्षाचे विचार ठेवू नका. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधा. आर्थिक आवक चांगली राहील. नोकरीत बदल होऊ शकतात. घरी पाहुण्या रावळ्यांचा आदर राहील. खाण्या-पिण्याची चंगळ राहील.

मीन- जवळचा प्रवास करावा लागेल. व्यवसायात विक्री चांगली राहील. जीवनसाथी आपल्याला सांभाळून घेईल. मनात आनंदी विचार राहतील. मुलांच्या यशामुळे समाधान वाटेल. भावंडांच्या भेटी होतील. गप्पाटप्पा होतील.

-विजय देशपांडे (ज्योतिष विशारद)

टॅग्स :Astrologyफलज्योतिष