शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

राशीभविष्य - १६ मे २०२२: अचानक धनलाभ होऊ शकतो; महत्वाच्या कामात यश मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 07:23 IST

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष- तुमचे बोलणे परिणामकारक ठरेल. मनासारखे भोजन मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. प्रवास शक्यतो टाळा. प्रवासात दगदग होईल. वाहन जपून चालवा. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल.

वृषभ – अडचणी दूर करण्यासाठी केलेले प्रयत्न फलद्रूप होतील. दगदग कमी होईल. जीवनसाथी आपल्याला चांगली साथ देईल. तुमचे म्हणणे जोडीदाराला पटवून देण्यात यशस्वी व्हाल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. सहकारी वर्गाशी जपून बोला. कुणाचे मन दुखावू नका.

मिथुन – नोकरीत तुमचा दबदबा राहील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. मात्र काही अनावश्यक खर्च होईल. एखाद्या व्यक्तीच्या वर्तणुकीचा त्रास होईल. आरोग्याची काळजी घ्या. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. मुलांच्या मनात काय आहे ते जाणून घ्या.

कर्क – तुमचे महत्त्व वाढवणाऱ्या घटना घडतील. तुमच्या कामाचे कौतुक होईल. मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील. आर्थिक आवक मनासारखी राहील. विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. अधिकारी वर्गाचे सहकार्य मिळेल. त्यामुळे कामांना गती मिळेल.

सिंह – नोकरीत अनुकूल घटना घडतील. कामात चांगले बदल होतील. बदलीला सामोरे जावे लागेल. घरी पाहुणे येतील. गप्पा गोष्टी करत वेळ मजेत जाईल. अचानक धनलाभ होईल. चांगल्या बातम्या कळतील. लोकांना योग्य सल्ला घ्याल.

कन्या – प्रवासाचा योग येईल. व्यवसायात विक्री चांगली होईल. कामाच्या निमित्ताने फिरणे होईल. भावंडाच्या भेटीगाठी होतील. मोठी गुंतवणूक करताना जाणकरांचा सल्ला घ्या. बाजारपेठेचा अंदाज चुकू शकतो. जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल.

तूळ – आर्थिक आवक चांगली राहील. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. मनासारखे भोजन मिळेल. मात्र चवदार जेवण आहे. म्हणून एकदम आडवा हात मारू नका. पोटाचा त्रास होईल. नोकरीत लाभ होईल. जीवनसाथी चांगली साथ देईल.

वृश्चिक – महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. अडचणी दूर होतील. मनात आनंदी विचार राहतील. जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल. नोकरीत चांगली परिस्थिती राहील. नावलौकीक वाढवणाऱ्या घटना घडतील. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल.

धनू – व्यवसायात धाडसी निर्णय घेतले जातील. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. जीवनसाथीचे म्हणणे ऐकून घ्या. धार्मिक कार्यात मन रमेल. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. काहींना प्रवास करावा लागेल. भावंडांशी वाद घालू नका.

मकर – चांगल्या बातम्या कानावर पडतील. महत्वाच्या कामात यश मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील. विविध प्रकारचे लाभ होतील. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. मुले प्रगती करतील. दूरच्या प्रवासाचा योग येईल. भावंडांच्या भेटीगाठी होतील.

कुंभ – नोकरीत उच्च अधिकार मिळतील. एखाद्या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला जाईल. आलेली संधी सोडू नका. घरी पाव्हण्या रावळ्यांचा राबता राहील. भावंडांशी गैरसमज होतील. आर्थिक आवक मनासारखी राहील.

मीन – भाग्याची चांगली साथ राहील. किरकोळ अडचणी दूर होतील. दूरच्या प्रवासाचा योग येईल. प्रवास कार्य साधक ठरेल. प्रसिद्धी मानसन्मान मिळेल. जीवनसाथी चांगली साथ देईल. तरूण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल.

विजय देशपांडे (ज्योतिष विशारद)

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष