शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

राशीभविष्य - ४ फेब्रुवारी २०२१: अचानक धन लाभाचा योग पण स्वास्थ्य खराब होऊ शकते

By प्रविण मरगळे | Updated: February 4, 2021 07:06 IST

Horoscope: जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस..

मेष - आज श्रीगणेशाचा आशीर्वाद लाभल्याने दिवसभर मानसिक दृष्ट्या समाधान वाटेल. कौटुंबिक जीवन सुखी राहील. त्याच बरोबर सुखमय प्रवास आणि रूचकर भोजन मिळण्याचा योग आहे. हरवलेली एखादी वस्तू सापडेल. आणखी वाचा

वृषभ - आज दिवसभर मनात आनंदाची छटा उमटेल. कामात व्यवस्थितपणे आघाडीवर राहाल आणि योजनेनुसार कार्यपूर्ण करू शकाल. अपूर्ण कामे यशस्वीरीत्या तडीस न्याल. आणखी वाचा

मिथुन -  आजचा दिवस मध्यम राहील. नवे काम हाती घेण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. पत्नी आणि संततीविषयी चिंता वाटेल. त्यामुळे मनात उद्विग्नता येईल. अजीर्ण झाल्याने तब्बेत नरम-गरम राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. आणखी वाचा

कर्क - आज सांभाळून राहा. शारीरिक उत्साह आणि मानसिक प्रसन्नता राहण्यासाठी आज कष्ट घ्यावे लागतील. छातीत दुखणे किंवा अन्य विकारांमुळे त्रास जाणवेल. घरातील व्यक्तींशी उग्र चर्चा किंवा वाद झाल्याने पण मन दुःखी होईल. आणखी वाचा

सिंह - कामात यश आणि प्रतिस्पर्ध्यांवर मात यांमुळे मनात प्रसन्नता दरवळेल. भावंडांशी भावदर्शी संबंध प्रस्थापित होतील. मित्र आणि स्नेही यांच्या समवेत एखाद्या रमणीय पर्यटन स्थळी हिंडण्या- फिरण्याचा आनंद घ्याल. तब्बेतही एकदम चांगली राहील. आणखी वाचा

कन्या - आजचा दिवस आपणासाठी शुभ राहील असे श्रीगणेश सांगतात. मधुर वाणी इतरांच्या मनावर सकारात्मक छाप पाडेल. घरगुती वातावरण चांगले राहील. वाणीवर ताबा ठेवल्याने वादविवाद होणार नाहीत. आर्थिक कामे मनासारखी पार पडतील. आणखी वाचा

तूळ –आपल्या प्रत्येक कामात आत्मविश्वास झळकेल असा श्रीगणेशाच्या आशीर्वाद आहे. आर्थिक योजना व्यवस्थित करू शकाल. शारीरिक व मानसिक शांतता लाभेल. आणखी वाचा

वृश्चिक - श्रीगणेश म्हणतात की आज तुमचा हौसमौज व मनोरंजन यासाठी खर्च होईल. स्वास्थ्यासंबंधी तक्रार राहील. मनाला चिंता लागून राहील. दुर्घटनेपासून जपा. कुटुंबीय किंवा सगे- सोयरे यांच्याशी गैरसमज होईल किंवा पटणार नाही. आणखी वाचा

धनु- आर्थिक लाभ आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळतील तसेच कौटुंबिक जीवनात सुख संतोष अनुभवाल. श्रीगणेश कृपेने मिळकतीत वाढ आणि व्यापारात लाभ मिळेल. आवडत्या व्यक्तीबरोबर सुखद क्षण अनुभवाल. मित्रांबरोबर पर्यटन स्थळाला भेट द्याल. आणखी वाचा

मकर - व्यवसायात धन, मान व प्रतिष्ठा वाढतील. व्यापारासाठी धावपळ व वसुलीसाठी प्रवास यातून फायदा संभवतो. वरिष्ठ तुमच्यावर खूश असल्याने पदोन्नतीचे योग आहेत. सरकार, मित्र किंवा संबंधितांकडून फायदा होईल. आणखी वाचा

कुंभ - श्रीगणेश म्हणतात की शारीरिक दृष्ट्या अस्वस्थ असलात तरीही मानसिक दृष्ट्या स्वस्थता टिकवण्याचा प्रयत्न करा. आज काम करण्याचा उत्साह कमी राहील. नोकरीत वरिष्ठापासून संभाळून राहावे लागेल. मौज-मजा तसेच सहली यासाठी खर्च होईल. आणखी वाचा

मीन - श्रीगणेशांना आज तुमचा अचानक धन लाभाचा योग दिसतो आहे. मानसिक तसेच शारीरिक श्रमामुळे स्वास्थ्य खराब होऊ शकते. सर्दी, श्वसनाचा त्रास, खोकला व पोट दुखी यांचा जोर वाढेल. खर्चात वाढ होईल. पाण्यापासून दूर राहा. इस्टेटीतून फायदा होईल. आणखी वाचा

टॅग्स :Astrologyफलज्योतिष