शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

राशीभविष्य - ९ मे २०२२: नोकरीत अनुकूल बदल होतील, तर 'या' राशीच्या लोकांनी सूर्यास्तापूर्वी कामे आटपा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 07:50 IST

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष- नातेवाईक, स्नेही यांच्या भेटी होती. नोकरीत अनुकूल बदल होतील. महत्त्वाच्या कामानिनित्त धावपळ करावी लागेल. मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील. खाण्यापिण्याची चंगळ राहील. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील.

वृषभ - धावपळीचा दिवस राहील. जवळपासचा प्रवास होईल. कामात एकसारखे व्यस्त राहाल. घरी अचानक पाहुणे येतील. त्यामुळे कामाचा ताण वाढेल. नोकरीत अनुकूल बदल होतील. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ.

मिथुन - आर्थिक आवक चांगली राहील. व्यवसायात विविध प्रकारच्या उलाढली होतील. त्यातून तुमचा फायदा होईल. मोठी गुंतवणूक करताना जाणकारांचा सल्ला घ्या. काहींना प्रवास करावा लागेल. भावंडांच्या भेटी होतील. आवडते पदार्थ भोजनाच्या थाळीत असतील.

कर्क - विविध प्रकारच्या कामांना गती मिळेल. जीवनसाथी आपल्याला साभाळून घेईल. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ. अनेक मार्गांनी पैसे मिळतील. खाण्यापिण्याची चंगळ राहील. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. तुमच्या शब्दाचा मान राखला जाईल.

सिंह - महत्त्वाचे काम सूर्यास्तानंतर करा. प्रवासाचे नीट नियोजन करा. मनावरील ताण निघून जाईल. आवडत्या छंदासाठी वेळ देता येईल. जीवनसाथीच्या कलाने घ्या. वादविवाद टाळणे योग्य ठरेल. धार्मिक कार्यासाठी खर्च होईल.

कन्या - धनलक्ष्मीची कृपा आपल्यावर राहील. अनेकांचे सहकार्य मिळेल. विविध मार्गांनी पैसे मिळतील. पैसे खर्च करण्याकडे कल राहील. प्रवास करावा लागेल. महत्त्वाचे काम सूर्यास्ताच्या आत उरकून घ्या. आरोग्याची काळजी घ्या. तिखट, मसालेदार पदार्थ खाणे टाळा.

तूळ - नोकरीत नवीन प्रकल्प राबविण्यात येतील. त्यात तुमचा कस पाहिला जाईल. त्यातून तुमचा फायदा होील. आर्थिक आवक मनासारखी राहील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास होईल. एखादी महत्त्वाची बातमी समजेल.

वृश्चिक - ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूनं राहील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. नोकरीत कामाचा व्याप सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागेल. घरी पाहूणे येतील. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल.

धनू - नोकरीत कामाचा ताण हळूहळू कमी होईल. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. मात्र सायंकाळपासून सर्व अडचणी दूर होतील. अनेकांचे सहकार्य मिळेल. त्यामुळे हुरूप वाढेल. प्रवासाचे योग येतील. वाहने जपून चालवा. मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील.

मकर - महत्त्वाचे काम सायंकाळच्या आत उरकून घ्या. जीवनसाथी आपल्याला चांगली साथ देईल. प्रवास शक्यतो टाळा. प्रवासात दगदग होईल. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. आर्थिक आवक चांगली राहील. व्यवसायात विक्रीचे प्रमाण चांगले राहील.

कुंभ - धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. थोडे रागावर नियंत्रण ठेवा. आरोग्याची काळजी घ्या. महत्त्वाचे काम सूर्यास्ताच्या नंतर हाती घ्या. म्हणजे सहज यश मिळेल.

मीन - मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. त्यामुळे आनंद होईल. प्रसिद्धी, मानसन्मान मिळेल. महत्त्वाचे काम दिवसा आटोपून घ्या. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. प्रवासात थोडी काळजी घ्या.

टॅग्स :Zodiac Signराशी भविष्य