शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राशीभविष्य - १४ मे २०२२: मकर राशीच्या लोकांना यशाची भरारी घेता येणार, पाहा काय म्हणते तुमची राशी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 07:29 IST

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष- ग्रहमानाची अनुकूलता हळूहळू तुमच्या बाजूने होईल. महत्त्वाच्या कामांना सूर्यास्तानंतर गती मिळेल. तोपर्यंत कामाची पूर्वतयारी करून ठेवा. थोडा संयम ठेवलेला बरा जीवनसाथी चांगली साथ देईल. मनासारखे भोजन मिळेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

वृषभ - मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील. मात्र, त्याच्याशी संवाद साधून त्यांना योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. आरोग्याची काळजी घ्या. महत्त्वाचे काम सूर्यास्ताच्या आत उरकून घ्या. प्रवासात दगदग होईल. आर्थिक आवक चांगली राहील. भेटवस्तू मिळतील.

मिथुन - दिवस धावपळीचा जाऊ शकतो. काहींना प्रवास करावा लागेल. प्रवासात दगदग होईल. मुलाची काळजी घ्या. त्याचे म्हणणे एंकून घेण्यासाठी वेळ पा. एखादी अनपेक्षित वार्ता कानावर पडेल. नातलगाच्या भेटीगाठी होतील, नोकरीत बदल होऊ शकतो.

कर्क - कामात उत्साह राहील. नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. जवळचे प्रवास करावे लागतील. नोकरीत कामाचा ताण वाढेल. तुमचे महत्त्व वाढेल. काहींना नवीन जबाबदारी घ्यावी लागेल. आर्थिक आवक चागली राहील.

सिंह - धनप्राप्तीचे योग आहेत. जुनी येणी वसूल होतील. खाण्या पिण्याची मौज राहील. प्रवासाचा बेत ठरेल. नोकरीत चांगली परिस्थिती राहील, तुम्हाला महत्त्व प्राप्त होईल. मात्र कुणाला दुखवू नका. धार्मिक कार्यात मन रमेल. मुलाशी संवाद साधा.

कन्या - अनुकूल परिस्थिती राहील, नवीन संधी मिळेल. विविध प्रकारचे लाभ होतील. मनात आनंदी विचार राहतील. आवडत्या व्यक्तीच्या सहवासात याल. खाण्या पिण्याची चंगळ राहील. मात्र जपून खा. नाही तर पोटाचा त्रास होईल. नोकरीत सामान्य परिस्थिती राहील.

तूळ - काहींना प्रवास करावा लागेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल, महत्त्वाचे काम सूर्यास्ताच्या नंतर हाती घ्या. तसेच सबुरीने वागण्याची गरज आहे. व्यवसायात वादाचे प्रसंग टाळा. जीवनसाथीशी वाद घालू नका. प्रेम प्रकरणात जपून पावले टाका.

वृश्चिक - आर्थिक आवक मनासारखी राहील. प्रवासाचा योग येईल. चांगल्या संधी चालून येतील. महत्त्वाचे निरोप येतील, अनावश्यक खर्च करण्याकडे कल राहील. महत्त्वाचे काम सूर्यास्ताच्या आत उरकून घ्या. त्यानंतर वेळ व पैसा जास्त प्रमाणात खर्च होईल.

धनू - शुभवर्तमान कळेल. ग्रहमान अनुकूल राहील. महत्त्वाचे काम सहजासहजी मार्गी लागेल. धनलाभाच्या दृष्टीने अनुकूल काळ आहे. प्रवास घडून येतील. प्रवासात सतर्क राहा. अनोळखी लोकांशी सावधपणे व्यवहार करा. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील.

मकर - यशाची भरारी घेता येईल. मात्र सूर्यास्ताच्या आत महत्त्वाचे काम करून घ्या. नोकरीत आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल. मात्र थोडी दगदग होईल. कामात काही बदल होतील. धनलाभाच्या दृष्टीने अनुकूल काळ आहे. प्रवासाचे योग आहेत.

कुंभ - दगदग होईल, अशी कामे करू नका, महत्त्वाचे काम संध्याकाळच्या नंतर हाती घ्या. प्रवासात दगदग होईल, वाहने जपून चालवा. आर्थिक आवक चागली राहील. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. मनासारखे भोजन मिळेल.

मीन - व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. भागीदाराचे सहकार्य मिळेल. जीवनसाथी आपल्याला चांगली साथ देईल. महत्त्वाचे काम सूर्यास्ताच्या आत उरकून घ्या. प्रवास शक्यतो टाळा. खर्चाचे प्रमाण वाढते राहील.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष