शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
3
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
4
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
5
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
6
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
7
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
8
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
9
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
10
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
11
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
12
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
13
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
14
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
15
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
16
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
17
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
18
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
19
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
20
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
Daily Top 2Weekly Top 5

राशीभविष्य - १३ मे २०२२: मीन राशीच्या लोकांना मिळणार प्रेमात अपेक्षित यश, पाहा काय म्हणते तुमची राशी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 07:32 IST

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष- कामे आरामात करण्याचा प्रयत्न करा. आवडत्या छंदासाठी वेळ काढता येईल. तुमच्या  कामाची प्रशंसा होईल. धनप्राप्तीचे होईल. तब्येतीची काळजी घ्या. महत्त्वाचे काम पुढे ढकलणे ठीक राहील. प्रवास शक्यतो टाळलेले बरे. प्रवासात दगदग होईल.

वृषभ - मुलांना अपेक्षित संधी मिळतील. त्यामुळे घरात आनंदी वातावरण राहील. महत्त्वाच्या कामात सर्वांचे सहकार्य मिळेल. काहींना प्रवास घडून येईल. नोकरीत वैताग वाढेल. थोडे संयमाने वागणे आवश्यक आहे. आर्थिक आवक चांगली राहील.

मिथुन - जवळचे नातेवाईक स्नेही यांच्या भेटी होतील. नोकरीत धावपळ करावी लागेल. नवीन नोकरीच्या शोधआत असाल तर संधी मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील. मुलांची काळजी वाटेल. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. जीवनसाथीची चांगली साथ मिळेल.

कर्क - व्यवसायात भरभराट होईल. नवीन ऑर्डर मिळतील. हाती पैसा येईल. नातेवाईकांच्या सहवासात याल. वेळ मजेत जाईल. कुणाला पैसे उसने देताना विचार करून द्या. मुले अभ्यासात प्रगती करतील.

सिंह - अती स्पष्टपणे बोलून लोक तोडू नका. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. आत्मविश्वासाने वाटचाल सुरू राहील. आर्थिक आवक चांगली राहील. जवळच्या लोकांच्या भेटीगाठी होतील. मनासारखे भोजन मिळेल. नोकरीत अनुकूल स्थिती राहील.

कन्या - अनुकूल ग्रहमान राहील. मनासारखीकामे होतील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. तुमच्या शब्दाचा मान राखला जाईल. तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. प्रेम प्रकरणात यश मिळेल. जीवनसाथी आपल्याला सांभाळून घेईल. महत्त्वाचे निरोप येतील.

तूळ - महत्त्वाचे काम पुढे ढकलणे योग्य ठरेल. लोकांकडून हवा तसा प्रतिसाद आणि सहकार्य मिळणार नाही. त्यामुळे चिडचिड होईल. कामाचा व्याप सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागेल.

वृश्चिक - नोकरीत प्रभावीपणे कामे हातावेगळी कराल. त्यामुळेकाही लोक नाराज होतील. पण तुमचे महत्त्वा वाढेल. आर्थिक आवक चांगली राहील. अनपेक्षितपणे लाभ होतील. मुलांना अपेक्षित संधी मिळेल. बोलण्यावर थोडे नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. 

धनू - नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. कामात बदल होईल. नवीन संधी मिळेल. त्यातून तुमचा फायदा होईल. जवळचे नातेवाईक भेटतील. त्यांच्याशी बोलून मन मोकळे झाल्यासारखे होईल. नोकरी, घर आणि नातेसंबंध यात समन्वय साधाल. आर्थिक बाजू चांगली राहील.

मकर - उत्तम ग्रहमान राहील. मनासारखी कामे होतील. नशिबाची साथ मिळेल. जवळपासचा प्रवास होईल. जवळच्या लोकांच्या भेटीगाठी होतील. जोडीदार चांगली साथ देईल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. सार्वजनिक कार्यात सहभागी व्हाल. तुमची प्रशंसा होईल. 

कुंभ - ग्रहमानाची स्थिती फारशी अनुकूल राहणार नाही. त्यामुळे मोठे धाडस करू नका. थोडे सतर्क राहा. कागदपत्रे, सामानाची काळजी घ्या. इतरांना आपणहून सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नका.

मीन - व्यवसायात भरभराट होईल. माल हातोहात खपेल, हाती पैसा येईल. जोडीदार तुमच्या मर्जीनुसार वागेल. प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. नोकरीत अनुकूल घटना घडतील. अनावश्यक खर्चाला कात्री लावली पाहिजे.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष