शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राशीभविष्य - १२ मे २०२२: मकर राशीच्या लोकांना मिळणार भाग्याची साथ, पाहा काय म्हणते तुमची राशी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 07:31 IST

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष- नोकरीत कामाचा ताण कमी करण्यासाठी केलेले प्रयत्न सफल होतील. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. कायदेविषयक कामे मार्गी लागतील. आर्थिक आवक चांगली राहील. आरोग्याची काळजी घ्या. आराम करणे आवश्यक आहे.

वृषभ - नोकरीत सामान्य परिस्थिती राहील. एखाद्या सहकाऱ्यामुळे डोक्याला ताप होऊन बसेल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. नावलौकिक वाढवणाऱ्या घटना घडतील. 

मिथुन - नोकरीत कामाचा व्याप सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागेल. थोडी भटकंती करावी लागेल. घरी पाहुणे येतील. त्यामुळे धावपळ होईल. सुखसोयी वाढवून मिळतील. वरिष्ठांची मदत मिळेल. कायद्याची बंधने पाळा. मनात काळजीचे विचार राहतील.

कर्क - आर्थिक आवक चांगली राहील. व्यवसायात विक्री चांगली होईल. जवळच्या प्रवासाचे योग येतील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. मोठी गुंतवणूक करताना खबरदारी घ्या. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल.

सिंह - धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक. महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. नोकरीत तांगली परिस्थिती राहील. वादविवाद टाळणे योग्य ठरेल. कामाचा ताण कमी होईल.

कन्या - अडचणी दूर होतील. मनात आनंदी विचार राहतील. सर्वांचे सहकार्य मिळेल. जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल. नात्यात गोडवा राहील. विवाहेच्छुकांचे विवाह ठरण्याच्य दृष्टीने हालचाली होतील. तरुणांना प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. काहींना भेटवस्तू मिळतील.

तूळ - नोकरीत ठिकठाक परिस्थिती राहील. मात्र कामाचा ताण राहील. कामाच्या निमित्ताने दगदग होईल. प्रवास शक्यतो टाळा. आरोग्याची काळजी घ्या. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. संयमाने वागा. धार्मिक तसेच सामाजिक कार्यात सहभागी व्हाल.

वृश्चिक - नोकरीत सहकारी मित्रांशी वाद होण्याची शक्यता आहे. कामाचा ताण वाढेल. मात्र, तुमचे पारडे जड राहील. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. विविध प्रकारच्या भेटवस्तू मिळतील. घरात किरकोळ कारणावरून कुरबूर होईल. मुलांच्या यशाच्या वार्ता कानी पडतील.

धनू - नोकरीत नवीन जबाबदारी अंगावर पडेल. त्यातून तुमचा फायदा होईल. काही सुख-सुविधा मिळतील. पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर काम कमी होईल. घरी पाहुण्यारावळ्यांचा राबता राहील. जीवनसाथीची गैरसमज होतील.

मकर - भाग्याची चांगली साथ राहील. प्रसिद्धी मानसन्मान मिळेल. नावलौकिक वाढवणाऱ्या घटना घडतील. पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास होईल. जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल. मनासारखे भोजन मिळेल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. त्यांच्याशी संवाद राहील.

कुंभ - महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. थोडे सबुरीचे धोरण ठेवलेले बरे. प्रवास शक्यतो टाळा. दगदग होईल अशी कामे अंगावर ओढवून घेऊ नका. नाही तर काही ना काही करणआरे लोक बाजूला राहतील आणि तुमच्यावर खापर फोडले जाईल. 

मीन - विवाहेच्छुंचे विवाह ठरण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. जीवनसाथीशी मधूर संबंध राहतील. भेटवस्तू मिळतील. नोकरीत चांगली परिस्थिती राहील. तुमचे महत्त्व लोकांना पटेल. कायद्याची बंधने पाळा. व्यर्थ खर्च टाळा.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष