शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
6
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
7
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
8
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
9
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
10
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
11
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
12
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
13
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
14
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
15
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
16
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
17
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
18
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
19
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
20
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

राशीभविष्य - ११ मे २०२२: मालमत्तेची कामे मार्गी लागतील, तर ‘या’ राशीच्या लोकांनी महत्त्वाची कामे पुढे ढकलावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 07:51 IST

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष- अनुकूल वातावरण राहील. आपल्या अनेक इच्छा पूर्ण होतील. जवळचे प्रवास होतील. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. सार्वजनिक कार्यात सहभागी व्हाल. तुमचा नावलौकिक होईल. विविध प्रकारचे फायदे होतील. मनासारखे भोजन मिळेल.

वृषभ - लोकांच्या भेटीगाठी होतील. घरी नातेवाईकांचे आगमन होईल. आर्थिक बाजू बळकट राहील. जोडीदार तुमच्या मर्जीनुसार वागेल. नोकरीत नवीन जाबाबदारी अंगावर पडेल. थोडे काळजीपूर्वक काम करणे आवश्यक आहे. कुणाचे मन दुखावले जाईल, असे  बोलू नका.

मिथुन - जवळचे प्रवास घडून येतील. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. व्यवस्थित माहिती घेऊन गुंतवणूक करा. आर्थिक आवक चांगली राहील. व्यवसायात सतत कार्यरत राहाल. नोकरीत चांगली परिस्थिती राहील. स्वत:हून इतरांना सल्ला देऊ नका.

कर्क - ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील. चांगल्या लोकांच्या सहवासात याल. लोकांची मदत मिळेल. कामे आटोक्यात येतील. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. मनासारखे खाणे-पिणे होईल.

सिंह - जे जे काही ठरवाल ते ते होईल. खोळंबून राहिलेली कामे गती घेतील. अनपेक्षितपणे लोक मदत करतील. जोडीदार तुमच्या पाठीशी उभा राहील. नोकरीत चांगली स्थिती राहील. एखादी सतावत असलेली चिंता दूर होईल.

कन्या - महत्त्वाचे काम शक्यतो पुढे ढकलणे ठीक राहील. अन्यथा मनस्ताप सहन करावा लागेल. त्यापेक्षा थोडा संयम ठेवलेला बरा. प्रवासाचा योग येईल. नोकरीत कामाचा व्याप सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागेल. चिडचिड करू नका.

तूळ - पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास होईल. प्रवासात मौजमजा करता येईल. हाती घेतलेली काम तडीस न्याल. सहकारी मदत करतील. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. नोकरीत तुमचे वर्चस्व राहील. उंची वस्त्रे चैनीच्या वस्तू खरेदी करण्याचा मोह आवरणार आहे.

वृश्चिक - सभा, समारंभ गाजवाल. समाजसेवा करण्यासाठी पुढाकार घ्याल. नातेवाईक, इष्टमित्र यांच्या भेटीगाठी होतील. काहींना प्रवास करावा लागेल. इतकांच्या समस्या सोडवण्यासाठी यशस्वी मध्यस्थी कराल. नोकरीत नवीन जबाबदारी घ्यावी लागेल.

धनू - पर्यटन, धार्मिक स्थळांना भेटी या निमित्ताने प्रवास होतील. तुमच्या कामाचे कौतुक होईल. नावलौकिक वाढवण्याऱ्या घटना घडतील. सहकारी मदत करतील. त्यामुळे नोकरीतील कामे मार्गी लागतील. व्यवसायात चांगली परिस्थिती राहील.

मकर - मालमत्तेची कामे मार्गी लागतील. त्यातून तुम्हाला चांगला लाभ होईल. आपल्यावर धनलक्ष्मीची कृपा राहील. व्यवसायात विक्री चांगली होईल. महत्त्वाचे काम शक्यतो पुढे ढकला. मुलांना अपेक्षित संधी मिळेल. 

कुंभ - नोकरीत तुमचे पारडे जड राहील. तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल. तुमच्या म्हणण्याप्रमाणे निर्णय घेतले जातील. हाती घेतलेले काम पूर्ण होईल. व्यवसायात आगेकूच सुरू राहील. आर्थिक आवक राहील. जीवनसाथीचा सल्ला महत्त्वाचा ठरले.

मीन - महत्त्वाचे काम पुढे ढकलणे इष्ट ठरेल. अन्यथा वेळेचा अपव्यय होईल. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. प्रवासात सतर्क राहा. खाण्यापिण्याचे पथ्य पाळले पाहिजे. जोडीदार तुमच्या पाठीशी उभा राहील. व्यवसायात बरकत राहील.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष