शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राजस्थान मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, जयपूरमध्ये बांधले जाणारे पहिले जेम बोर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 06:33 IST

ॲनिमल वेल्फेअर बोर्डाला अमृता देवी स्टेट ॲनिमल वेल्फेअर बोर्ड, असे नाव देण्याचाही मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

जयपूर : मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी राजस्थान मंत्रिमंडळाची मंगळवारी बैठक झाली, यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये राजस्थान अर्धवेळ कंत्राटी नियुक्ती नियम-२०२३ ला मान्यता, जयपूरमध्ये जेम बोर्सची स्थापना आणि विविध संस्थांना जमिनीचे वाटप, असे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यासोबतच ॲनिमल वेल्फेअर बोर्डाला अमृता देवी स्टेट ॲनिमल वेल्फेअर बोर्ड, असे नाव देण्याचाही मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

आता अर्धवेळ कामगारांना ३ लाख रुपयांपर्यंतचा लाभमंत्रिमंडळाने राजस्थान अर्धवेळ कंत्राटी नियुक्ती नियम-२०२३ च्या मसुद्याला मंजुरी दिली आहे. यामध्ये अर्धवेळ कामगारांना त्यांची सेवा संपल्यावर २ ते ३ लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य पॅकेज मिळेल. हे लाभ विभागांमध्ये काम करणाऱ्या अर्धवेळ कर्मचाऱ्यांना सेवा समाप्ती, मृत्यू आणि सेवानिवृत्तीनंतर दिले जातील. हे नियम तयार झाल्यानंतर अर्धवेळ कामगारांच्या भरतीमध्ये पारदर्शकता येणार असून, त्यांना आर्थिक पाठबळही मिळणार आहे. उल्लेखनीय म्हणजे २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्र्यांनी अंगणवाडी सेविका, मदतनीस, स्वयंपाकी यांसारख्या अर्धवेळ काम करणाऱ्या मानधन कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीवर आर्थिक साहाय्य देण्याच्या उद्देशाने राजस्थान अर्धवेळ कंत्राटी नियुक्ती नियम-२०२३ जाहीर केले होते.

जयपूरमध्ये राज्याचा पहिला जेम बोर्स बांधणार : ६० हजार लोकांना मिळणार रोजगारजयपूरमधील जेम बोर्सची स्थापना आणि विकासासाठी आरक्षित दराने सुमारे ४४ हजार चौरस मीटर जमीन उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. ही जमीन जयपूर जेम अँड ज्वेलरी बोर्ड (एसपीव्ही)ला ९९ वर्षांच्या लीजवर औद्योगिक राखीव दराच्या तिप्पट दराने जेम बोर्ड स्थापन करण्यासाठी दिली जाईल. त्यामुळे रत्नांच्या निर्यातीला चालना मिळेल. सुमारे ६० हजार लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. याचा राज्याच्या आर्थिक विकासावर आणि प्रगतीवर सकारात्मक परिणाम होईल.

प्राणी कल्याण मंडळाचे नाव आता अमृता देवी राज्य प्राणी कल्याण मंडळराज्य प्राणी कल्याण मंडळाचे नाव आता ‘अमृता देवी राज्य प्राणी कल्याण मंडळ’ असे असेल. अमृता विष्णोई यांनी प्राणी आणि जंगलांच्या रक्षणासाठी केलेले बलिदान आणि सजीवांप्रती समर्पण व्यक्त करण्यासाठी मंडळाच्या नावात बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. यातून सामान्य माणसाला पशू-पक्ष्यांच्या कल्याणासाठी प्रेरणा मिळेल.

ज्वेलर्समध्ये आनंदाची लाट- डेरेवालाज्वेलर्सची जुनी मागणी पूर्ण झाल्याने मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आनंदाची लाट उसळली. सरकारच्या निर्णयाचे कौतुक करताना जेम बोर्सचे अध्यक्ष प्रमोद अग्रवाल डेरेवाला म्हणाले की, या निर्णयामुळे जयपूरच्या ज्वेलरी उद्योगाला जगात नवी उंची मिळेल. बांधकामासाठी १,२०० ते १,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. जयपूरच्या व्यावसायिकांशिवाय देशातील आणि जगातील व्यावसायिकांची कार्यालये येथे उघडतील. त्यामुळे येथे साठ हजार लोकांना रोजगाराची संधी मिळणार आहे. कलर जेम स्टोन, प्रिशियस जेम स्टोनसह ज्वेलरी व्यवसाय एकाच छताखाली करता येतो. जयपूरचा दागिन्यांचा व्यवसाय देशात आणि जगात आणखी वाढेल.

टॅग्स :Rajasthanराजस्थानAshok Gahlotअशोक गहलोत