शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

'सोनिया गांधी नाही, वसुंधरा राजे मुख्यमंत्र्यांच्या नेत्या'; सचिन पायलटांचा गेहलोतांवर जोरदार हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2023 13:43 IST

माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याबाबत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राजस्थानचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे.

माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याबाबत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राजस्थानचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. गेहलोत यांच्या वक्तव्यानंतर त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी सचिन पायलट यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. गेहलोत यांचे नाव न घेता पायलट म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या नेत्या सोनिया गांधी नसून वसुंधरा राजे आहेत. सरकार वाचवण्यासाठी वसुंधरा राजे यांचे नाव घेतल्याने विरोधाभास निर्माण होतो. मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे. तसेच पायलट यांनीअजमेरहून पदयात्रेची घोषणाही केली.

पायलट यांनी मंगळवारी जयपूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन आरोपही केले. हायकमांडने समिती स्थापन केली. राज्यसभा पोटनिवडणुकीत आम्ही सर्वांनी पक्षाला विजय मिळवून दिला. आम्ही शिस्त मोडली नाही.  मला बेकार आणि देशद्रोही म्हटले. आम्हाला पक्षाचे नुकसान करायचे नव्हते. काँग्रेस आमदारांचा अपमान करण्यात आला. मुख्यमंत्री भाजप नेत्यांचे कौतुक करत आहेत, असंही पायलट म्हणाले. 

राष्ट्रवादीला भाजपची 'B' टीम म्हणणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना शरद पवारांचा खोचक टोला

यादरम्यान पायलट यांनी ११ मे पासून राजस्थान लोकसेवा आयोगाच्या अजमेर येथील कार्यालयापासून जयपूरपर्यंत जनसंघर्ष पदयात्रा काढण्याची घोषणा केली. ही पदयात्रा पाच दिवसांची असेल, असंही पाटलट म्हणाले. 'मी हताश आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. जनता हीच देव आहे, असंही पाटलट म्हणाले. 

टॅग्स :rajsamand-pcराजसमंदSachin Pilotसचिन पायलट