शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

'विकासकामे दुप्पट वेगाने पुढे नेणार'; राहुल गांधी यांचे राजस्थानातील सभेत आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 08:36 IST

तारानगरसह नोहर (हनुमानगड) आणि सादुलशहर (श्रीगंगानगर) येथे राहुल यांची सभा पार पडली.

जयपूर : राजस्थानमध्ये काँग्रेस सरकारने कल्याणकारी योजनांसह अनेक विकास कामे केली आहे. परंतु भाजपची सत्ता आल्यास सर्व कामे थांबविली जातील. त्यामुळे काँग्रेसला पुन्हा संधी दिल्यास आतापर्यंत जनतेसाठी केलेली कामे दुप्पट वेगाने पुढे नेली जातील, असे आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिले. चुरूच्या तारानगर येथील ‘काँग्रेस गॅरंटी रॅली’ला ते संबोधित करत होते.

काँग्रेसने राजस्थानमध्ये राबविलेली पेन्शन योजना, आरोग्य योजना, ५०० रुपयांत गॅस सिलिंडर, महिलांना १० हजारांची दिली जाणारी मदत या सारख्या अनेक योजना भाजपची सत्ता आल्यास बंद होईल. सर्वसामान्य लोकांऐवजी अब्जाधीशांना ते मदत करतील. त्यामुळे काँग्रेसला पुन्हा संधी दिल्यास शेतकऱ्यांसह छोटे उद्योजक, गरीब जनतेला निश्चित फायदा होईल, त्यामुळे निर्णय मतदारांना घ्यायचा आहे, असेही राहुल म्हणाले. तारानगरसह नोहर (हनुमानगड) आणि सादुलशहर (श्रीगंगानगर) येथे राहुल यांची सभा पार पडली.

एकत्र आहोत, एकत्र राहणार

राजस्थानमध्ये काँग्रेस नक्की विजयी होईल. आम्ही सोबत दिसत नसलो, तरी आम्ही सर्व नेते एकत्र आहोत आणि एकत्र राहणार, असे मत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जयपूर विमानतळावर व्यक्त केले. यावेळी त्यांच्यासमवेत मुख्यमंत्री अशोक गेहलोत, माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट तसेच प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा आदी उपस्थित होते.

राहुल गांधींची आज तेलंगणात प्रचारसभा

काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे तेलंगणातील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये उद्या, १७ नोव्हेंबर रोजी प्रचारासाठी नुक्कड सभा घेणार असून रोड शोमध्येही सहभागी होतील. काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले की, राहुल गांधी हे उद्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर हेलिकॉप्टरने पिनापाका येथे रवाना होतील. तिथे ते काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी नुक्कड सभा घेणार आहेत. काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले की, राहुल गांधी हे उद्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर हेलिकॉप्टरने पिनापाका येथे रवाना होतील. तिथे ते काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी नुक्कड सभा घेणार आहेत.

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस