शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"देशाचा महासत्तेकडे प्रवास, तर राजस्थानचा गुन्हेगारीकडे"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2023 10:36 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका; कॉंग्रेसचे राजकारण तुष्टीकरणाचे

लोकमत न्यूज नेटवर्कजयपूर : ज्या राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता येते, त्या राज्यांमध्ये भ्रष्टाचारी, गुन्हेगार, दंगलखोरांना मुक्त वातावरण मिळते. काँग्रेसमुळेच राजस्थान हे देशात भ्रष्टाचार, दंगली, गुन्हेगारीमध्ये अग्रेसर राज्य ठरले आहे. तुष्टीकरणासाठीच ते काम करत असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. भरतपूर येथील भाजपच्या ‘विजय संकल्प सभेला’ ते संबोधित करत होते. 

एकीकडे भारत देश जागतिक महासत्तेच्या दिशेने प्रवास करत आहे, तर दुसरीकडे राजस्थानात गेल्या पाच वर्षांमध्ये काय झाले?  या काळात राजस्थानचे जे नुकसान झाले, त्यास कोण जबाबदार आहे?  मागील पाच वर्षांमध्ये होळी असो, रामनवमी असो वा हनुमान जयंती, कोणताही सण येथील नागरिक शांततेत साजरे करू शकले नाही. सणासुदीच्या काळात राज्यात दंगली, दगडफेक, संचारबंदी लावण्यात आली, असे मोदी म्हणाले.

दिलेली आश्वासने पूर्ण करणारचराजस्थानला प्रगतिपथावर नेण्याचा संकल्प भाजपने केला आहे. दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, त्याची हमी मी देतो, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी आश्वासित केले.

जादूगर होईल छू-मंतरकाही लोक स्वतःला जादूगर समजतात. परंतु निकालावेळी लोकच म्हणतील, ‘३ डिसेंबर, काँग्रेस छू-मंतर. अशी टीका मोदींनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर केली.

राजस्थानात पेट्रोल महाग का? राजस्थानचे शेजारी राज्य असलेल्या हरयाणा, मध्य प्रदेश तसेच गुजरातमध्ये पेट्रोल ९७ रुपये लिटर मिळते, मग राजस्थानमध्ये ते १०९ रुपयांना कसे काय मिळते? येथील काँग्रेस सरकार लिटरमागे तुमच्या खिशातून १२ रुपये काढते. भाजपची सत्ता आल्यास काँग्रेसचा हा खेळ बंद होईल, असेही मोदी म्हणाले.

‘तुम्ही कितीही प्रयत्न करा; सत्तेवर काँग्रेसच येईल’ जयपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कितीही प्रयत्न केले, तरी राजस्थानमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसच सरकार स्थापन करेल, असा विश्वास काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला. श्रीमंतांना अधिक श्रीमंत आणि गरिबांना अधिक गरीब करण्याचे काम भाजप करत असल्याची टीकाही त्यांनी केली. भरतपूर जिल्ह्यातील वैर येथील सभेला ते संबोधित करत होते.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्त्वातील काँग्रेस सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी काम केले, तर भाजपचे नेते म्हणतात की ही रेवडी योजना आहे. आम्ही तर शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले, पण तुम्ही तर श्रीमंतांचे १५ कोटींचे कर्ज माफ करण्याचे काम केले. अग्निवीर योजनेतून केंद्र सरकार देशभरातील युवकांची फवसणूक करत असल्याचेही खरगे यांनी नमूद केले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाElectionनिवडणूक