शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

एकमेकांना रनआऊट करण्यात गेली ५ वर्षे; मोदींची कॉंग्रेसवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 08:04 IST

पंतप्रधान मोदींची कॉंग्रेसवर उपरोधिक टीका

लोकमत न्यूज नेटवर्कजयपूर : देशात विश्वचषकाचा ज्वर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी तोच धागा पकडून काँग्रेसवर जाेरदार हल्लाबोल केला. ‘राजस्थान काँग्रेस पक्ष एखाद्या क्रिकेट संघासारखा आहे, ज्यांच्या फलंदाजांनी एकमेकांना धावबाद करण्यात पाच वर्षे घालवली,’ अशी उपरोधिक टीका त्यांनी केली.

तारानगर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राजेंद्र राठोड यांच्या समर्थनार्थ चुरू जिल्ह्यात जाहीर सभेला संबोधित करताना, मोदींनी राज्याचा जलद विकास सुनिश्चित करण्यासाठी आगामी राजस्थान निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले.क्रिकेटमध्ये एक फलंदाज येतो आणि त्याच्या संघासाठी धावा काढतो; पण काँग्रेसमध्ये एवढी भांडणे आहेत की, धावा करण्याऐवजी त्यांच्या नेत्यांनी एकमेकांना धावबाद करण्यातच पाच वर्षे घालवली आणि राजस्थानचा विकास खोळंबला. आम्ही  राजस्थानला पुन्हा विकासाच्या वाटेवर नेऊ, असे ते म्हणाले.

राज्याचा वेगवान विकास करणार...

काँग्रेस आणि विकास हे एकमेकांचे शत्रू आहेत आणि शत्रूच राहतील. चांगला हेतू आणि काँग्रेस यांच्यातील संबंध प्रकाश आणि अंधार यांच्यासारखाच आहे.

राजस्थानमध्ये भाजपची सत्ता आल्यास सर्व भ्रष्ट लोकांना बाहेर घालवणार आणि राज्याचा वेगवान विकास करणार, असे आश्वासनही त्यांनी दिले.

भारत प्रत्येक क्षेत्रात नवीन विक्रम प्रस्थापित करत आहे आणि नवीन पराक्रम गाजवत आहे. कोणतेही क्षेत्र घ्या, भारत आश्चर्यकारक कामगिरी करत आहे. सर्वत्र उत्साह आहे आणि २०४७ पर्यंत आपण भारताला विकसित देश बनवू, असा विश्वास आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी