शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

२.५ लाख सरकारी नोकऱ्या,४५० रुपयांमध्ये सिलिंडर; राजस्थानमध्ये भाजपच्या संकल्पपत्रात घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 08:28 IST

१२ वी उत्तीर्ण मुलींना माेफत स्कूटीही देणार

जयपूर : विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने गुरुवारी संकल्प पत्र जाहीर केले. राज्यात भाजपची सत्ता आल्यास पुढील ५ वर्षांमध्ये २.५ लाख सरकारी नोकऱ्या देण्यासह उज्ज्वला योजनेंतर्गत ४५० रुपयांमध्ये गॅस सिलिंडर देण्याची घोषणा करण्यात आली. तसेच, १२ वी उत्तीर्ण मुलींना मोफत स्कूटी देण्याचेही आश्वासन देण्यात आले.

भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, प्रदेशाध्यक्ष सी.पी. जोशी, केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल, गजेंद्रसिंह शेखावत यांच्यासह अनेक नेते यावेळी उपस्थित होते. या वेळी नड्डा म्हणाले, भाजपची सत्ता आल्यास सर्वप्रथम पेपर लीक तसेच अन्य घोटाळ्यांच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना केली जाईल.  केंद्र सरकारने राजस्थानसाठी आतापर्यंत सर्वतोपरी सहकार्य केले आहे, परंतु तुष्टीकरण, पेपर लीक, विविध योजनांमधील भ्रष्टाचार संपविण्यासाठी भाजपच्या डबल इंजिन सरकारची आवश्यकता आहे.

केंद्राने दिले ४४ हजार कोटी

केंद्र सरकारने राजस्थानमध्ये ४४ हजार कोटींचा निधी दिला. त्याअंतर्गत ११ हजार किमीचे रस्ते बांधण्यात आले. रेल्वेनेही राजस्थानमधील प्रकल्पासाठी १४ पट निधी वाढविला. वंदेभारत एक्स्प्रेस दिली. कोटामध्ये ग्रीनफिल्ड विमानतळाला मंजुरी दिल्याचे भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी सांगितले.

कालवा याेजना पूर्ण करण्याचे आश्वासनपूर्व राजस्थान कालवा याेजना केंद्राच्या सहकार्याने पूर्ण करण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे. सत्ताधारी काॅंग्रेसने या याेजनेला राष्ट्रीय दर्जा देण्याची मागणी यापूर्वीच केली आहे. १३ जिल्ह्यांसाठी ही याेजना महत्त्वाची आहे.

अन्य पक्षांसाठी वचननामा जाहीर करणे ही केवळ औपचारिकता आहे, मात्र भाजपचा हे संकल्प पत्र आहे. त्यात दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.- जे.पी. नड्डा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष 

संकल्प पत्रात कोणत्या घोषणा?

  • पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक १२ हजारांपर्यंत आर्थिक मदत 
  • एमएसपीसह बोनस देत २७०० रुपये प्रतिक्विंटल दराने गव्हाची खरेदी 
  • लाडो प्रोत्साहन योजनेंतर्गत गरीब कुटुंबातील मुलींच्या जन्मानंतर ‘सेव्हिंग बाँड’ 
  • उज्ज्वला योजनेंतर्गत गरजू महिलांना ४५० रुपयांमध्ये गॅस सिलिंडर
  • पुढील ५ वर्षांत २.५ लाख सरकारी नोकऱ्या 
  • काँग्रेस सरकारच्या कार्यकाळातील भ्रष्टाचाराबाबत श्वेतपत्रिका 
  • केजीपासून पीजीपर्यंत मोफत शिक्षण
  • मातृत्व योजनेंतर्गत महिलांना ५ हजारांऐवजी ८ हजारांची वित्तीय मदत
टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकBJPभाजपा