शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
3
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
5
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
6
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
7
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
8
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
9
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
10
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
11
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
12
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
13
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
14
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
15
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
16
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
17
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
18
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
19
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
20
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात

२०० कोटींची अवैध दारू आणि रोकड जप्त; राजस्थानात छापेमारी, अमली पदार्थांचे चलनही जोरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2023 08:59 IST

ईडीची होत असलेली कारवाई हाच काँग्रेसचा विजय होणार याचा पुरावा आहे, अशी टीका राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, जयपूर :  राजस्थानमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाच्या सूचनेनुसार राज्यातील विविध अंमलबजावणी संस्था अवैध साहित्य जप्त करण्याच्या बाबतीत रोज नवनवीन विक्रम करीत आहेत. ९ ऑक्टोबर रोजी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर अंमलबजावणी यंत्रणांनी २०० कोटींहून अधिक किमतीची अवैध दारू, रोख रक्कम आणि इतर साहित्य जप्त करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. 

२०१८च्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या संपूर्ण आचारसंहितेदरम्यान ६५ दिवसांत ७० कोटी रुपयांचे अवैध साहित्य जप्त करण्यात आले होते. मुख्य निवडणूक अधिकारी प्रवीण गुप्ता यांनी सांगितले की, राज्यातील विविध यंत्रणांनी जारी केलेल्या अहवालानुसार ३२ कोटी ६७ लाख रुपयांच्या जप्तीसह जयपूर राज्यात आघाडीवर आहे. दुसऱ्या क्रमांकावर १३ कोटी ३४ लाख रुपयांसह बांसवाडा, तिसऱ्या क्रमांकावर १२ कोटी ७४ लाख रुपयांसह उदयपूर, चौथ्या क्रमांकावर १२ कोटी रुपयांसह अलवर, तर १० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या जप्तीसह बाडमेर पाचव्या स्थानावर आहे.

बाडमेरमध्ये ७ कोटींचे ड्रग्ज जप्त

अवैध दारू जप्तीत अलवर पहिल्या क्रमांकावर आहे. तेथे ४ कोटी ३० लाख रुपयांचे मद्य जप्त झाले. अमली पदार्थ जप्तीच्या बाबतीत बाडमेर पुढे आहे. तेथे ७ कोटी ४० लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. ७ कोटी ७७ लाख रुपयांची अवैध रोकड जप्त करून जयपूर पहिल्या क्रमांकावर आहे. ११.१४ कोटी रुपयांचे सोने आणि चांदीसारखा मौल्यवान धातू जप्त करून बांसवाडा पहिल्या स्थानावर आहे.

हाच काँग्रेसच्या विजयाचा पुरावा : अशोक गेहलोत 

निवडणुका तोंडावर आल्या असतानाच राज्यात सातत्याने ईडीकडून कारवाई केली जात आहे. सरकारी यंत्रणांचा वापर करून भाजपकडून काँग्रेस नेत्यांना त्रास दिला जात आहे. ईडीची होत असलेली कारवाई हाच काँग्रेसचा विजय होणार याचा पुरावा आहे, अशी टीका राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली आहे.

 

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूक