शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

पनवेल महापालिकेत झीरो गार्बेजचा ठराव मंजूर, कचरामुक्त शहराचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 06:27 IST

स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशभरात स्वच्छतेबाबत विविध उपक्रमांतून जनजागृती करण्यात येत असून सर्व शासकीय कार्यालये, लोकप्रतिनिधींमार्फत स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.

- वैभव गायकरपनवेल : स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशभरात स्वच्छतेबाबत विविध उपक्रमांतून जनजागृती करण्यात येत असून सर्व शासकीय कार्यालये, लोकप्रतिनिधींमार्फत स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. याच धर्तीवर पनवेल महापालिकेने झीरो गार्बेज संकल्पना राबविण्याचा निश्चय केला असून याकरिता नुकताच याबाबतचा ठराव पनवेल महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर करण्यात आला.सद्यस्थितीत घनकचरा व्यवस्थापन ही पालिकेसह सर्वच व्यवस्थापनाला न झेपणारी अशी बाब आहे. याकरिता लागणारे मनुष्यबळ तसेच आर्थिक बाजूचा विचार केल्यास मोठ्या प्रमाणात आर्थिक भार हा संबंधित प्रशासनाच्या तिजोरीवर पडत असतो आहे. यासंदर्भात योग्य नियोजन व जनजागृती केल्यास घनकचरा व्यवस्थापनाचा मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे. या गोष्टीला पर्याय म्हणून झीरो गार्बेज संकल्पना पुढे आली आहे. नुकतेच पनवेल महापालिकेने देखील यासंदर्भात ठराव मंजूर करून स्वच्छतेच्या बाबतीत एक पाऊल पुढे टाकले आहे.पनवेल महापालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात कचराकुंड्या ठेवण्यात आलेल्या आहेत. या कुंड्यामुळे रस्त्यावर अस्वच्छता निर्माण होतेच त्याचबरोबर रहदारीलाही अडथळा निर्माण होतो. घनकचरा व्यवस्थापनात हा एक प्रकारे अडथळा आहे. त्यामुळे आगामी काळात पनवेल महापालिका कचरा कुंड्यामुक्त करण्याचा संकल्प प्रशासनाचा आहे.पनवेल शहरात ओला सुका कचºयाचे वर्गीकरण करण्यात येत नाही. एकंदरीतच महापालिका क्षेत्रात या कचरा कुंड्या व्यवस्थापन बिघडत असल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे. महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापनाचे नियोजन सुरू आहे. त्याकरिता मायक्र ो प्लानिंग सुरू असून कचरा कुंड्यांना थारा देण्यात आला नसल्याचे समजते. ओला कचरा आणि सुका कचरा वर्गीकरणाची सवय सोसायट्यांना लावण्यात येणार आहे. त्याचबरोबर ओला कचरा त्याच ठिकाणी जिरविण्याचे नियोजन सुध्दा सुरू आहे. तसेच यासंदर्भात झीरो गार्बेज या संकल्पनेनुसार पालिकेने ठराव मंजूर केल्याने घनकचरा व्यवस्थापनाला गती प्राप्त होणार आहे. यासंदर्भात पनवेल महापालिकेचे नगरसेवक हरेश केणी यांनी सर्वप्रथम सभागृहात आवाज उठवला होता. झीरो गार्बेज संकल्पनेनुसार त्यांनी तळोजा फेज वनमध्ये पहिल्यांदा संकल्पना राबविली आहे. घनकचरामुक्त तळोजा शहर ही मोहीम ते सध्या राबवत असून त्याच धर्तीवर पालिकेने केलेला झीरो गार्बेजचा ठराव महत्त्वपूर्ण मानला जात आहे.वेंगुर्ले नगरपरिषदेचा पाहणी दौºयाची मागणीकोकणातील वेंगुर्ले नगरपरिषदेने झीरो गार्बेज ही संकल्पना सत्यात उतरवली आहे. कचºयापासून मिथेन, विविध प्रकारची खते, बायोगॅस, प्लॅस्टिकपासून रस्ते अशा प्रकारच्या अनेक संकल्पना नगरपरिषदेने सत्यात उतरविल्या आहेत.याच धर्तीवर पनवेल शहराचा कायापालट होऊ शकते. त्यामुळे पनवेल महापालिकेच्या नगरसेवकांचा वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीत अभ्यास दौरा आयोजित करण्याची मागणी शेकाप नगरसेवक हरेश केणी यांनी पालिकेकडे केली आहे.काय आहे झीरोगार्बेज संकल्पनाकचरा ज्या ठिकाणी निर्माण होतो, त्याच ठिकाणी त्या कचºयाचे विघटन करणे म्हणजेच झीरो गार्बेज. या व्यतिरिक्त ओला, सुका कचºयाचे एकाच जागेवर वर्गीकरण केल्यास पुढील घनकचरा व्यवस्थापनाची प्रक्रिया सोपी होते.झीरो गार्बेज संकल्पना ही स्वच्छ भारत अभियानाचाच एक भाग आहे. याकरिता महापालिका विविध उपाययोजना राबविणार आहे. पालिका हद्दीतील नागरिकांनी याबाबत पुढाकार घेणे गरजेचे आहे. घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात आपल्या सवयीत बदल करणे गरजेचे आहे. आपला परिसर स्वच्छ, सुंदर होण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावल्यास झीरो गार्बेज संकल्पना सत्यात उतरेल.- जमीर लेंगरेकर, उपायुक्त,पनवेल महानगर पालिका

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान