शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

जंजिरा मुक्ती संग्राम दिन उत्साहात

By admin | Updated: February 1, 2017 00:52 IST

मुरुड तालुका पत्रकार संघ व रायगड प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी मुरुड येथे जंजिरा मुक्ती संग्राम दिन उत्साहात संपन्न झाला.

नांदगाव/मुरुड : मुरुड तालुका पत्रकार संघ व रायगड प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी मुरुड येथे जंजिरा मुक्ती संग्राम दिन उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी सकाळी ध्वजारोहण मुरुड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा स्नेहा किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्व शासकीय अधिकारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच शालेय विद्यार्थी सुद्धा यामध्ये सहभागी झाले होते. ध्वजारोहण संपन्न होताच जैन समाज मंदिर सालेसा भवन येथे जंजिरा मुक्ती संग्राम लढ्याविषयी माहिती सांगण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी काशिद समुद्रकिनारी सुमारे ३४ पर्यटकांचे प्राण वाचवणारे परेश रक्ते, राकेश रक्ते, अमोल कासार, दीपेश पवार, सुमित कासार, प्रतीक बेलोसे,सनेश्वर कासार,निखिल शिंदे व नितेश बोरे यांना पत्रकार संघातर्फे शौर्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी छायाचित्रकार नितीन शेडगे यांना रायगड प्रेस क्लबच्या कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाल्याबद्दल नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांच्या हस्ते मानपत्र देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे मुख्य वक्ते माजी मुख्याध्यापक सुरेश उपाध्ये यांनी नवाब सरकारने ३१ जानेवारी १९४८ साली त्यावेळचे मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री ब.ग.खेर यांच्या समक्ष सामील नाम्यावर सही केल्याने जंजिरा संस्थान भारतात विलीन झाले. त्याकाळी भारत देश १५ आॅगस्ट १९४७ साली स्वतंत्र झाल्यावर मुरु ड, श्रीवर्धन व म्हसळा येथील लोकांना सुद्धा आपण भारतात सामील झालो पाहिजे अशी जाणीव झाल्यावर विविध संघटनांच्या माध्यमातून आंदोलने केली गेली. म्हसळा व श्रीवर्धन येथे लोकांचा तीव्र आंदोलनाचा वेग पाहून अखेर नवाब सरकारने येथून काढता पाय घेण्याचे ठरवले व सामीलनाम्यावर सही केली. जंजिरा संस्थानला दोन नवाब लाभले परंतु या दोन्ही नवाबाचा राज्यकारभार जनतेला पसंत असणाराच होता. विविध विकासकामे त्या काळात त्यांनी केली व ती अजूनही येथे चांगल्या स्थितीत असून जनता त्याचा लाभ घेत आहे. नवाबकालीन गटार व्यवस्था उत्तम असून पावसाचे पाणी गटाराच्या माध्यमातून समुद्रात सोडविण्याची उत्तम व्यवस्था त्याकाळात केली होती. जंजिरा संस्थान स्वतंत्र होण्यासाठी आंदोलन सुद्धा झाले पण रक्ताचा एक थेंबही न सांडता हे आंदोलन यशस्वी होऊन भारतात विलीन झाले. यावेळी त्यांनी जुन्या गोष्टींना उजाळा देत नवाबांचा इतिहास सांगितला.नवनिर्वाचित रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय मोकल व कार्याध्यक्ष भारत रांजणकर यांचा सत्कार मुरु ड तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आला. या कार्यक्र माचे सूत्रसंचालन मेघराज जाधव तर आभार प्रदर्शन उदय खोत यांनी केले. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्षा स्नेहा पाटील, महिला व बालकल्याण सभापती मुग्धा जोशी, पाणीपुरवठा सभापती प्रमोद भायदे, नगरसेवक आशिष दिवेकर आदी मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)