शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

गोरेगावातील तरुणांमुळे ३५ गावांतील ३४० कुटुंबांना मिळाले छप्पर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2020 00:38 IST

गोरेगांव येथील सुमारे १५० तरुणांनी व्हॉट्सअ‍ॅपवर ‘निसर्ग सायक्लॉन सपोर्ट’ हा ग्रुप बनवून, त्या माध्यमातून सुमारे बारा लाखांची मदत गोळा केली. या मदतीतून ३५ गावांतील सुमारे ३४० वादळग्रस्त कुटुंबांना छप्पर मिळाले आहे.

- गिरीश गोरेगावकरमाणगाव : समाज माध्यमांचा वापर फक्त करमणूक अगर वेळ घालविण्यासाठी केला जातो. यामुळे आज समाज माध्यमांकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला नाही. असे असले, तरी रायगड जिल्ह्यातील गोरेगांव येथील तरुणांनी व्हॉट्सअ‍ॅपचा सकारात्मक वापर करून दाखविला आहे. गोरेगांव येथील सुमारे १५० तरुणांनी व्हॉट्सअ‍ॅपवर ‘निसर्ग सायक्लॉन सपोर्ट’ हा ग्रुप बनवून, त्या माध्यमातून सुमारे बारा लाखांची मदत गोळा केली. या मदतीतून ३५ गावांतील सुमारे ३४० वादळग्रस्त कुटुंबांना छप्पर मिळाले आहे.समाज माध्यमांचा सकारात्मक वापर करून, गोरेगांवमधील या तरुणांनी एक आदर्श निर्माण केला आहे.गोरेगांव आणि परिसरातील तरुण मुले आणि मुली नोकरी, व्यवसायानिमित्त मोठ्या शहरात वास्तव्यास आहेत. चक्रीवादळाची दाहकता त्यांना समजली आणि आपल्या जन्मभूमीसाठी काहीतरी भरीव काम करायचे, या उद्देशाने मयूर खुळे, प्रवीण मोहिते, प्रमोद सवदत्ती, महावीर जैन, शुभम भोकरे, सचिन खुळे, अनिल गवसकर, रितेश हुजरे, रोहित रातवडकर, तुषार शिंदे, केतन शाह यांसारख्या जवळपास १५० युवकांनी ‘निसर्ग सायक्लॉन सपोर्ट’ हा ग्रुप स्थापन केला आणि त्या समूहाद्वारे आपल्या अन्य मित्रांना आपल्या गावासाठी मदत करण्याचे आवाहन केले. त्यातूनच राजकीय पदाधिकारी, सामाजिक संस्था यांची मदत न घेता, या ग्रुपने काम सुरू केले.प्रमोद सवदत्ती, रोहित रातवडकर, तुषार शिंदे, महावीर जैन, अनिल गवसकर, शुभम भोकरे यांनी जे गरीब आणि निराधार, गरजू आहेत, ज्यांचे छप्पर या वादळाने हिरावून घेतले, त्या घरांचा ग्राउंड लेव्हलला सर्व्हे करून संकलित केलेली माहिती या ग्रुपवर पाठविली आणि मदतीचा ओघ सुरू झाला. ‘गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे’ या भावनेतून या तरुणांनी केलेल्या कामामुळे अनेकांना आधार मिळाला.श्रमदानावर भरआतापर्यंत ३५ गावांमधून सुमारे ३४० कुटुंबांना या ग्रुपच्या वतीने छप्पर देण्यात आले. जवळपास बारा लाख रुपये खर्च करीत, १२,५०० कौले, ८ हजार कोने, ११०० सिमेंट पत्र्यांची मदत घरपोच झाली. त्यातून जे अत्यंत निराधार आहेत आणि कमावते नाहीत, अशा कुटुंबांच्या घरावर ग्रुपने श्रमदान करून, स्वत: छप्पर घातले. अजूनही मदत देण्याचे काम सुरू आहे. ४५० घरांना मदत देण्याचा मानस या ग्रुपचा असून, त्यांच्या या सामाजिक जाणिवेचे कौतुक होत आहे.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळRaigadरायगड