शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

"तुम्ही शिवाजी महाराजांचा फोटो काढा, आम्ही बाळासाहेबांचा काढतो"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 08:44 IST

दादा भुसे याचे उद्धव ठाकरे यांना आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : बाळासाहेब ठाकरे हे एका व्यक्तीचे बाप नाहीत ते समस्त शिवसैनिकांचे बाप आहेत. बाळासाहेब हे राष्ट्रपुरुष असल्याचे जाहीर केले आहे. शिवसैनिकांच्या बापाला कमी लेखू नका. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो काढतो, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो काढून जनतेच्या दरबारात जा, असे आव्हान राज्याचे बंदरे, मत्स्यविकास मंत्री दादा भुसे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले आहे.          

मुख्यमंत्री असताना शिवसैनिकांना भेटले नाहीत आणि आता प्रत्येकाला भेटत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अडीच महिन्यांपासून काम करीत आहेत. तसे काम अद्याप एकाही मुख्यमंत्र्यांनी आधी केलेले नाही, असेही भुसे यांनी म्हटले आहे. शिंदे गटाची रायगड जिल्हा कार्यकारिणी आढावा बैठक गुरुवारी अलिबाग येथे आमदार महेंद्र दळवी यांच्या निवासस्थानी झाली. दसरा मेळाव्याच्या नियोजनासाठी ही बैठक होती. यावेळी भुसे यांनी उद्धव यांच्यावर टीकास्त्र सोडले. शिवसेना पक्षप्रमुख हे आपल्या भाषणात शिवसेना सोडून गेलेल्या आमदारांवर गद्दार, तसेच बाप पळविल्याची टीका करीत आहेत. याबाबत भुसे यांनी समाचार घेतला. शिंदे आणि भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर जनतेसाठी विविध हितकारी निर्णय घेतले आहेत. ते जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन उपस्थितांना केले. दसरा मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही केले आहे.

‘अडीच वर्षे घरातच’आमदारांनी उठाव केला तेव्हा आम्ही घरातील भांडण मिटावे यासाठी प्रयत्न करीत होतो. त्यावेळी उद्धव ठाकरे यांची मानसिकता आमदार यांच्या बाजूने बदलत होती. मात्र संजय राऊत, भास्कर जाधव यायचे आणि ठाकरे यांचे विचार बदलत होते. अडीच वर्ष घरात बसून काहीही काम केले नाही. निर्णय घेण्याबाबत आम्ही उद्धव यांना सांगत होतो. मात्र अजित पवार हे खोडा घालण्याचे काम करीत असल्याने आमची अडचण झाली, असे भुसे म्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे