पाली : वाकण-पाली-खोपोली या राज्य महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. रस्त्यावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे दिसत आहे. दररोज या मार्गावरून हजारो वाहने जातात. या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू केल्याने प्रवासात अडचणी येत असल्या तरी लवकरच ही समस्या दूर होणार असल्याने प्रवासी व वाहनचालकांमधून समाधान व्यक्त होत आहे.पाली-खोपोली-वाकण हा मार्ग कायम सुस्थिती राहावा व जनतेचा प्रवास सुखकर व्हावा याकरिता सार्वजनिक बांधकाम उपविभाग पालीचे कार्यकारी उपअभियंता संदीप चव्हाण कायम प्रयत्नशील असतात. या मार्गाचे नुकतेच डांबरीकरण करून रस्ता सुस्थितीत केल्याने वाहन चालकांची वेगमर्यादा खूप वाढली असल्याने व रस्ते अरुंद वळणाचे असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. ही बाब लक्षात घेवून उपअभियंता संदीप चव्हाण यांनी या मार्गाचे रुंदीकरणासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून दीड कोटीचा निधी मंजूर करून घेतला असून या मार्गाचे रुंदीकरणाचे काम जलद गतीचे सुरू असल्याचे दिसत आहे. यामध्ये रुंदीकरण, साइडपट्टी, क्रेश बेरियर, संरक्षण भिंत आदी कामे करण्यात येत आहेत. (वार्ताहर)वाकण-पाली मार्गाचे रुंदीकरण केल्याने या मार्गावरील अपघाताचे प्रमाण कमी होईल, तसेच या मार्गाच्या रुंदीकरणाच्या कामाकडे मी स्वत: लक्ष घालत असल्याने हे काम चांगल्या दर्जाचेच होईल.- संदीप चव्हाण, उपअभियंता, सा. बां. विभाग पाली
वाकण-पाली मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू
By admin | Updated: May 2, 2016 01:08 IST