शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
2
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
3
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
4
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
5
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार
6
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
7
Viral News: कानपूरहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात उंदीर; उड्डाणाला साडेतीन तास विलंब!
8
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
9
अमूलनं बटर, तूप, चीज, आईस्क्रीम आणि चॉकलेटच्या किमती केल्या कमी; प्रत्येक वस्तूवर किती बचत होणार? जाणून घ्या
10
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
11
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
13
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
14
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
15
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
16
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
17
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
18
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
19
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
20
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!

रोह्यात जलयुक्त शिवारांची कामे रखडली

By admin | Updated: June 15, 2017 02:57 IST

रोहा तालुक्यात २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी ‘जलयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत एकूण ९३ कामांना मंजुरी मिळाली आहे; परंतु जिल्हा प्रशासनाच्या दिरंगाईमुळे या कामांना

- मिलिंद अष्टिवकर। लोकमत न्यूज नेटवर्क

रोहा : रोहा तालुक्यात २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी ‘जलयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत एकूण ९३ कामांना मंजुरी मिळाली आहे; परंतु जिल्हा प्रशासनाच्या दिरंगाईमुळे या कामांना प्रशासकीय मान्यता पावसाच्या तोंडावर मिळाल्याने त्यातील बहुतांश कामे रखडली आहेत. प्रशासनाच्या सुस्त कारभाराचा फटका येथील शेतकऱ्यांना बसणार असून, शासनाच्या हलगर्जीबद्दल शेतकरी संतप्त असल्याची प्रतिक्रि या शेतकरी संघटनेचे दशरथ साळवी यांनी दिली आहे.‘जलयुक्त शिवार’ म्हणजे पाणलोट क्षेत्राचा विकास असून दुष्काळाचा सामना करण्यासाठी शासनाने डिसेंबर २०१४मध्ये ‘जलयुक्त शिवार’ योजना सुरू केली. नाले, खोलीकरण, रुंदीकरण, पाझरतलाव, लघुसिंचन करणे, पिण्याच्या पाण्याचा स्रोत बळकट करणे, पावसाचे पाणी गावाच्या शिवारात अडविणे, भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविणे, शेतीसाठी पाणी संरक्षित करणे, वळणबंधारा बांधणे, सिमेंट नाला बांध, माती नाला बांध, सलग समतल चर आदी कामे दुष्काळमुक्त करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. २०१६-१७करिता २५ कोटी ८ लाख ८४ हजार रुपयांचे अंदाजपत्रक रोहा कृषी खात्याकडून जिल्हाधिकारी कार्यालयात सुपूर्द केले होते. त्यापैकी १९ कोटी ४ लाख ८४ हजार रुपयांच्या विविध कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यावर्षी रोहे तालुक्यातील पाटणसई, वाली, भालगांव, खांबेरे, टेमघर या चार गावांची निवड करण्यात आली आहे. चार गावांतील एकूण ९३ कामांकरिता १९ कोटी ४ लाख ८४ हजार रुपयांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. पाटणसई येथील सिमेंटनाला बांध, वळण बंधारा, ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत गाव तलावातील गाळ काढणे, वनविभागातील सिमेंट नाला बांध ही कामे होणे शक्य नसल्याने शेतकरी वर्गात नाराजीचा सूर उमटत आहे. या विभागातील ५२ कामांपैकी २४ कामे रद्द झाली आहेत. इतर हक्कात वने आल्यामुळे त्यातील सलग समतल चर व अनगड दगडी बांध अशी १६ कामे रद्द करण्यात आली आहेत. तसेच संयुक्त जमीन मालकांपैकी एका शेतकऱ्याने हरकत घेतल्याने एक सिमेंट नाला बांध हे काम रद्द करण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे ठेकेदारांना दर परवडत नसल्याने या भागातील सर्वच्या सर्व अर्थातच ८ शेततळ्यांचे काम रखडणार आहे. या कामासाठी केवळ ५० हजार अनुदान मिळत असल्याने शेतकऱ्यांना वाढीव अनुदान मिळणे अपेक्षित आहे.वाली गावात सिमेंट नाला बांध व वळण बांध या कामांकरिता प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मात्र, पावसाळ्याच्या तोंडावर कामांना मान्यता मिळाल्यामुळे सदरची कामे रखडणार आहेत. सलग समतल चरातील ८ पैकी ६ कामे पूर्ण झाली आहेत. तर दोन कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. लूझ बोल्डर यातील ९ पैकी ५ कामे पूर्ण झाली, तर ४ कामे अंतिम टप्प्यात आली आहेत.भालगाव येथील मातीनाला बांध, सिमेंट नाला बांध व वळण बंधारा या कामांना प्रशासकीय मान्यता उशिरा मिळाल्यामुळे पावसाळ्यात काम होणे अवघड आहे. तसेच सीसीटीची १० कामे पूर्ण, तर ५ कामे निविदा प्रकियेमध्ये असून ती कामेदेखील पूर्ण होण्याची शक्यता आहे. खांबेरे टेमघर येथेदेखील परिस्थिती जैसे थे आहे. मातीनाला बांध, सिमेंट नाला बांध व वळण बंधारा या महत्त्वाच्या कामांना उशिरा प्रशासकीय मान्यता मिळाल्यामुळे सदरची कामे रखडणार आहेत. सीसीटी यातील १२ पैकी ६ पूर्ण तर ६ कामे ठेकेदार करीत नसल्याची बाब समोर येत आहे. एकंदरित जिल्हा प्रशासनाकडून पावसाळ्याच्या तोंडावर या लाखमोलाच्या कामांना मंजुरी मिळाल्याने ही कामे रखडली आहेत. शेतकरी वर्गाने याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.