शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

‘रायगड’ परिसरातील गावांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी काम, नाम फाउंडेशनच्या माध्यमातून काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 01:47 IST

किल्ले रायगडाचा विकास रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर परिसरातील गावांचादेखील विकास हातात घेण्यात आला आहे.

दासगाव : किल्ले रायगडाचा विकास रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर परिसरातील गावांचादेखील विकास हातात घेण्यात आला आहे. या गावातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून काम केले जाणार आहे. याकरिता एक आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी बोलताना पालकमंत्री आदिती तटकरे यांनी या परिसरात नियोजनबद्ध काम करताना शासकीय अधिकारीआणि स्थानिक रहिवाशांची भूमिका मोलाची ठरणार असल्याचे प्रतिपादन केले.किल्ले रायगड परिसरातील २१ गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून काम केले जाणार आहे. याकरिता पाचाड येथे आढावा बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी नाम फाउंडेशनचे नाना पाटेकर, अभिनेते मकरंद अनासपुरे, खा. युवराज संभाजीराजे, खा. सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार भरत गोगावले, आ. अनिकेत तटकरे, माजी आ. माणिकराव जगताप  आदी मान्यवरांची उपस्थिती होती.यावेळी खासदार युवराज संभाजीराजे यांनी गडावर सुरू असलेल्या पाणीपुरवठा कामांची माहिती देत परिसरातील २१ गावांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी या गावातील ग्रामस्थांना बरोबर घेऊन आधुनिक तंत्रज्ञान वापर करत शिवकालीन जलस्रोत पुन्हा पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगितले.यावेळी शिवकाळातील नैसर्गिक स्रोत आणि त्यांना शासकीय योजनांचा आधार देत परिसरातील पाणी समस्या सोडवता येईल, असे स्पष्ट केले, तर किल्ले रायगड परिसरात असलेली गावे ही विविध वाड्यांमध्ये विखुरली आहेत. यामुळे विविध योजना राबवताना अडचणी येतात. मात्र, नाम फाउंडेशनच्या कामात आपला सहभाग असेल, असे सांगितले. 

शिवकालीन पिण्याच्या पाण्याचा स्रोत यावेळी मकरंद अनासपुरे यांनीदेखील शिवकालीन पिण्याच्या पाण्याचा स्रोत शोधून तो पुनरुज्जीवित करणे हे नामचे काम असून, पाण्याबरोबर या परिसरात प्रत्येक पर्यटकाने आणि शिवभक्ताने एक झाड लावून त्याची जोपासना केली पाहिजे, असे आवाहनदेखील केले. नाना पाटेकर यांनी कोणतेही काम करताना जात, धर्म आणि पक्ष सोडून काम केले पाहिजे, असे सांगून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत काम करण्याचे भाग्य लाभल्याने सुरुवातीस दोन गावांतील पाणी प्रश्न तडीस नेऊ, असे सांगितले. किल्ले रायगड परिसरात काल जलविद्युत प्रकल्प भूमिपूजन आपण केले असून, अद्याप तो पूर्ण झाला नसल्याने परिसरातील पाणी प्रश्न कायम असल्याचे माजी आमदार माणिकराव जगताप यांनी सांगितले.

टॅग्स :Nana Patekarनाना पाटेकरRaigadरायगड