शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
2
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
3
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
4
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
5
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
6
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
7
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
8
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
9
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
10
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
11
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
12
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
13
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
14
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
15
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
16
हत्ती आणि हरीण; पूरग्रस्तांना फक्त आर्थिक नव्हे, मानसिक आधाराची गरज!
17
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
18
राहुल गांधी यांचे 'नागरिकत्व' आणि 'ईडी'; या एन्ट्रीमुळे प्रकरणाला अनपेक्षित वळण
19
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
20
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा

महाड-म्हाप्रळ-पंढरपूर मार्गाचे काम संथगतीने; प्रवासी त्रस्त, गेले काही महिने काम ठप्पच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 01:34 IST

महाड जवळून गेलेल्या म्हाप्रळ-पंढरपूर मार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू असून, गेले काही महिने हे काम ठप्प असल्याने महाड ते वराठी, म्हाप्रळपर्यंत खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागत आहे.

दासगाव : महाड जवळून गेलेल्या म्हाप्रळ-पंढरपूर मार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू असून, गेले काही महिने हे काम ठप्प असल्याने महाड ते वराठी, म्हाप्रळपर्यंत खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागत आहे. या भागातून ये -जा करत असलेल्या अवजड वाहनांमुळे यात अधिकच भर पडली असून, नागरिकांच्या या समस्येकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी मात्र दुर्लक्ष करत आहेत. (Work on Mahad-Mhapral-Pandharpur road is slow; Travelers suffer, work stalled for the last few months) म्हाप्रळ-पंढरपूर हा राज्यमार्ग १५ महाडजवळून गेला आहे. महाड तालुक्यातील वराठीपासून सुरुवात होऊन तालुक्यातील शिरगाव, पुढे खरवली, माझेरी करत पुणे जिल्हा हद्दीत प्रवेश होतो. महाड हद्दीतील रस्त्याची देखभाल दुरुस्ती ही महाड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात होती मात्र आता हा मार्ग महामार्ग बांधकाम विभागाकडे वर्ग झाला असून, हा मार्ग ९६५ डी. डी. या नवीन क्रमांकाने ओळखला जात आहे. महामार्ग विभागाने या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी दोन वर्षांपूर्वी सुरुवात केली. मात्र कोरोना संक्रमण वाढल्याने हे काम बंद ठेवले गेले. त्यातच ज्या ठेकेदाराला हे काम देण्यात आले होते त्याच ठेकेदाराने किल्ले रायगड मार्गाचेदेखील काम घेतले होते. हे काम अर्धवट ठेवल्याने या ठेकेदाराला दिलेले काम संपुष्टात आणले आणि महाड-म्हाप्रळ-पंढरपूर मार्गाचे कामदेखील सदर ठेकेदाराकडून काढून घेण्यात आले. या प्रक्रियेमुळे गेली अनेक महिने हे काम ठप्प आहे. यामुळे जागोजागी केलेले खोदकाम, मोऱ्यांची कामे, प्रवाशांना वाहन चालवताना धोकादायक ठरत आहेत.तालुक्यातील शिरगावपासून पुढे सव गावापर्यंत रस्ता काही अंशी बरा आहे मात्र स‌व गावांपासून पुढे कोणता खड्डा चुकवायचा? असा प्रश्न वाहनचालकापुढे पडत आहे. रत्नागीरी जिल्हयाला हा रस्ता जोडला गेला असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील सीमेवरील गावांचा अधिक संबंध महाडला असल्या कारणाने बाजारपेठ आणि शिक्षण आदी कारणास्तव या रस्त्यावर कायम वर्दळ असते. प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी वाहनांबरोबरच पुणे, रायगड, आणि मुंबईकडे जाणाऱ्या एस.टी.च्या गाड्यादेखील या परिसरातून ये-जा करत असतात.  या मार्गावर महाड तालुक्यातील गोमेंडी, वराठी, जुई, चिंभावे, तुडील, सव, रावढळ, म्हाप्रळ आदी गावे येतात. या परिसरातील नागरिकांचा थेट संबंध हा महाड शहराशी येत असल्याने प्रतिदिन वाहनांची ये-जा मोठी असते. त्यात या विभागात वामणे, हे कोकण रेल्वेचे स्थानकदेखील आहे. रखडलेल्या कामामुळे या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक बनले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे कानाडोळा केला आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकRaigadरायगड