शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
3
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
4
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
5
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
6
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
7
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
8
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
9
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
10
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
11
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
12
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
13
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
14
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
15
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
16
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
17
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
18
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
19
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
20
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला

रायगड जिल्ह्यातील महिला असुरक्षित; ६ वर्षात महिला अत्याचाराचे ९९९ गुन्हे दाखल

By निखिल म्हात्रे | Updated: February 12, 2024 11:19 IST

मागील ६ वर्षातील बलात्कार व विनयभंगाच्या गुन्ह्यांवर नजर टाकल्यास जिल्ह्यातील महिला सुरक्षीत नसल्याचे विदारक सत्य समोर आले आहे.

अलिबाग - रायगड जिल्ह्यात आया-बहिणींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०२३ या ६ वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यात बलात्कार व विनयभंगाचे ९९९ गुन्हे दाखल झाले आहेत. महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पोलीस दलाने दामिनी पथक स्थापन केले आहे. मात्र, मागील ६ वर्षातील बलात्कार व विनयभंगाच्या गुन्ह्यांवर नजर टाकल्यास जिल्ह्यातील महिला सुरक्षीत नसल्याचे विदारक सत्य समोर आले आहे.

रायगड जिल्ह्यात महिला महिला सुरक्षीत नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. जिल्ह्यात बलात्कार व विनयभंगाचे गुन्हे वाढले असून, दर आठवड्याला सरासरी तीन ते पाच महिला या गुन्ह्यांना बळी पडत आहेत. या गुन्ह्यांची उकल करुन आरोपींना गजाआड करण्यात यश आल्याचे पोलीस विभागाकडून स्पष्ट करण्यात आले असून, ९९ टक्के गून्हांची उकल करण्यात आली आहे. बाजारात गर्दीच्या ठिकाणी, प्रवासात महिला प्रवाशांशी अंगलट, अल्पवयीन विद्यार्थिनींशी चाळे, महाविद्यालय आवारात छेडखानी, नको तिथे स्पर्श करून लज्जा उत्पन्न करणारे कृत्य असे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडतात. तर लग्नाचे अमिष दाखवून, नोकरीत बढती देण्याचे अमिष तसेच इतर प्रकारे शारिरीक संबंध प्रस्तापित करुन केल्याच्या तक्रारीही दाखल होत आहे. पूर्वी अत्याचाराला बळी पडलेल्या महिला बदनामीला घाबरून गप्प बसत असत. मात्र आता महिला आपल्यावरील अत्याचाराविरोधात आवाज ऊठवू लागल्या आहेत. त्या पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल करु लागल्या असल्याचे दाखल तक्रारींच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास स्पष्ट होते....महिला सुरक्षीततेसाठी दामिनी पथक -रायगड जिल्ह्यात महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस विभागाने महिला पोलिसांच्या दामिनी पथकाची निर्मिती केली आहे. त्यांना मोटारसायकल चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच या पथकाला विशेष प्रशिक्षणही देण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालये, बाजारपेठ, समुद्र किनारे आणि गर्दीच्या ठिकाणी या पथकाची नियमित गस्त सुरु असते. या पथकांचे नंबर शाळकरी मुली, महाविद्यालयीन तरुणी आणि महिलांना उपलब्ध करून दिले असून, या नंबरवर संपर्क साधल्यास अवघ्या काही मिनिटांत दामिनी पथक घटना स्थळी दाखल होऊ शकेल अशी व्यवस्था आहे. मात्र एवढे प्रयत्न करुनही महिलांसंबंधी गुन्हे कमी झाले नसल्याचे चित्र दाखल गुन्ह्यांची आकडेवारी पाहिल्यानंतर दिसून येते.महिला अत्याचार गुन्हे दृष्टीक्षेप

वर्ष : बलात्कार : विनयभंग२०१८ : ६४ : १२७२०१९ : ४९ : ८१२०२० : ५८ : १०१२०२१ : ५८ : ८९२०२२ : १०६ : ११३२०२३ : १०० : १५२एकूण : ३३६ : ६६३

टॅग्स :RaigadरायगडWomenमहिलाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी