शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘पालकमंत्री कक्षा’तून ठेवणार जिल्हा प्रशासनावर अंकुश?; लालफीतशाहीतून होणार सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2020 00:45 IST

जिल्ह्यात पालकमंत्री कक्षाची करणार स्थापना, गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता प्रमुख मंत्र्यांचा कारभार हा मंत्रालयातून हाकण्यावर निर्बंध आले होते. त्यामुळे प्रशासन वरचढ होत असल्याच्या  तक्रारी वाढल्या होत्या.

आविष्कार देसाई रायगड : नागरिकांना सातत्याने विविध समस्यांना सामोरे जावे लागते. कामासाठी संबंधित प्रशासकीय कार्यालयात खेटे मारूनही त्यांना अपेक्षित आणि गुणात्मक समाधान मिळत नाही. यावर आता उपाय म्हणून रायगड जिल्ह्यात ‘पालकमंत्री कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे. या माध्यमातून ‘लोकाभिमुख सरकार’ अशी प्रतिमा निर्माण करतानाच प्रशासनावर एक प्रकारे थेट अंकुश ठेवला जाणार असल्याचे चित्र आहे.

दैनंदिन जीवन जगताना नागरिकांचा प्रशासकीय कामाशी संबंध येतो. काही वेळेला प्रशासकीय लालफीतशाही आडवी येत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. दोष व्यवस्थेचा असतो मात्र सरकारच्या नावाने नागरिक खडी फोडतात. सरकार आणि प्रशासन अशा कारणांमुळे संबंध बिघडण्याच्या घटनाही घडलेल्या अनुभवास आलेल्या आहेत. याच कारणासाठी राज्यातील मंत्र्यांनी, नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी ‘जनता दरबार’ अशा संकल्पना राबविल्या आहेत. त्याच धर्तीवर रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी ‘पालकमंत्री कक्ष’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

तालुका, विभागीय आणि जिल्हा स्तरावर पालकमंत्री कक्षाच्या माध्यमातून कामकाज होणार आहे. यासाठी वर्ग-१ दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. नागरिकांचे प्रश्न तातडीने सुटावेत, सरकारी योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचावा, अशी त्यांची मूळ संकल्पना असली तरी प्रशासनावरही याच माध्यमातून थेट वचक ठेवण्यात मदतच मिळणार असल्याचे दिसून येते. प्रशासन आणि सरकार हे दोन्ही घटक एकमेकांसाठी पूरक असले पाहिजेत. यातील एखादा घटक जरी वरचढ झाला तर मूळ लोकशाही व्यवस्थेला अडचणीचे ठरू शकते. गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता प्रमुख मंत्र्यांचा कारभार हा मंत्रालयातून हाकण्यावर निर्बंध आले होते. त्यामुळे प्रशासन वरचढ होत असल्याच्या  तक्रारी वाढल्या होत्या.

नागरिकांशी थेट संवादपालकमंत्री कक्ष स्थापन झाल्याने जिल्ह्यातील नागरिकांशी थेट संवाद साधणे सोपे जाणार आहे. तसेच कामाचा निपटारा करताना गुणात्मकता जपण्याकडे स्वत: पालकमंत्र्यांचे लक्ष राहणार असल्याने प्रशासनातील अधिकाऱ्यांना आता थातूरमातूर उत्तर देता येणार नसल्याचे बोलले जाते. पालकमंत्री यांच्याच देखरेखीखाली नागरिकांच्या समस्यांचे निराकरण होणार असल्याने त्रास कमी होणार आहे. प्रशानाकडून लवकर होणाऱ्या कामासाठीही काही वेळा जाणीवपूर्वक उशीर होतो. त्यामुळे सातत्याने कार्यालयात खेटे मारूनही काम होत नाही. आता त्यामध्ये सुधारणा होईल, अशी आशा करायला हरकत नाही.

टॅग्स :Aditi Tatkareअदिती तटकरेRaigadरायगड