शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

माथेरानची ई-रिक्षा नक्की कुणाला नकोय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 12:54 IST

या रिक्षांवर दगडफेक करण्यापासून त्या बंद पाडण्याच्या कारवायांवर टिच्चून रिक्षा धावल्या. सध्या त्या बंद आहेत

मिलिंद बेल्हे, सहयाेगी संपादक

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर माथेरानमध्ये ई रिक्षाचा पायलट प्रकल्प राबविला गेला. त्याला स्थानिक नागरिक, विद्यार्थी, आजारी व्यक्ती, ज्येष्ठ नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. या रिक्षांवर दगडफेक करण्यापासून त्या बंद पाडण्याच्या कारवायांवर टिच्चून रिक्षा धावल्या. सध्या त्या बंद आहेत; पण त्या कोणी बंद केल्या, पायलट प्रोजेक्ट अर्धवट का सोडला, न्यायालयापेक्षा कोणती यंत्रणा वरचढ ठरतेय असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. त्याची उत्तरे विचारली, की प्रत्येक यंत्रणा दुसऱ्याकडे बोट दाखवतेय. 

माथेरानमधील झाडे मोठ्या प्रमाणात कमी होत आहेत. तापमान वाढतेय. पर्यावरण ढासळतेय. त्याच्या अनेक कारणांमध्ये घोडे-खेचरांची अमाप वाढलेली संख्या हेही एक कारण आहे. कोणताही अभ्यास न करता रातोरात वाटल्या जाणाऱ्या परवान्यांत कोणाचे हितसंबंध गुंतले आहेत, हे उघड गुपित नाक्यानाक्याला माहीत आहे. 

आम्ही पायलट प्रोजेक्ट बंद करायला सांगितला नव्हता. उलट पावसात ई रिक्षा कशी धावते ते पाहण्याची गरज आहे, असे सांगत सनियंत्रण समितीचे डेव्हिड कार्डोज, राकेशकुमार यांनी यंत्रणांना उघडे पाडल्याने रिक्षा बंद पाडण्याचे राजकारण समोर आले. 

हातरिक्षांना पर्याय म्हणून ई-रिक्षा आल्या; पण पर्यावरण वाचवायचे असेल, तर इलेक्ट्रिकवर चालणारी बस, ॲम्ब्युलन्स, मालवाहतुकीच्या गाड्या तेथे धावायला हव्या. 

माथेरानला प्रत्येक वस्तू वाहून नेणे प्रचंड त्रासाचे, कष्टाचे, खर्चाचे आहे. इलेक्ट्रिक वाहनांमुळे कष्ट कमी होतील. प्रत्येक वस्तू छापील किमतीपेक्षा महाग मिळते. पर्यटकांवरील तो भुर्दंड वाचेल. हे सर्व फायदे समोर असतानाही ई रिक्षा कोणी पंक्चर केल्या ते कळायला मार्ग नाही. त्यासाठी पुन्हा न्यायालयीन लढाई लढण्याची वेळ आली आहे.

रेल्वेचे हात कोणी बांधले आहेत?- रेल्वेने सलून कोचचा प्रयोग फसला; पण गेली अनेक वर्षे फक्त मालवाहतुकीसाठी नेरळ ते माथेरान आणि अमन लॉज ते माथेरान मालवाहतुकीच्या फेऱ्या करण्याची मागणी सुरू आहे. त्यासाठी रेल्वेकडे सर्व यंत्रणा उपलब्ध आहे. तरीही मालवाहतुकीच्या उत्पन्नावर रेल्वे पाणी का सोडते आहे, हा माथेरानवासीयांना पडलेला प्रश्न आहे.- कोणाच्या दबावापोटी रेल्वे मालवाहतुकीकडे दुर्लक्ष करते आहे, याचे उत्तर रेल्वेचे अधिकारी देण्यास तयार नाहीत. ते मुंबईकडे बोट दाखवून मोकळे होतात.

टॅग्स :Matheranमाथेरान