शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

‘ते’ सपनो के सौदागर गेले कुठे?-धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 06:45 IST

मोेदी सरकारवर टीका; नेरळ येथे आघाडीची सभा

कर्जत : मागील २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जनतेला अच्छे दिनची स्वप्ने दाखविणारे सपनो के सौदागर गेले कुठे? असा प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नेरळ येथे उपस्थित केला. नेरळ येथील हुतात्मा हिराजी पाटील चौकात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार पार्थ अजित पवार यांच्या निवडणूक प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन केले होते. त्या वेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीका केली.२०१४ मध्ये तत्कालीन गुजरात राज्याचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना भारतीय जनता पक्षाने आपले पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले आणि देशभर फिरत त्यांनी अच्छे दिन येण्याची स्वप्ने जाहीर सभांतून दाखवली आणि त्या वेळी जनतेने त्या स्वप्नांना भुलून मोदींच्या हाती सत्ता दिली; पण त्या मोदी यांनी स्वत:चे बहुमत असताना काय केले? हे दाखवून द्यावे, असे आव्हान देताना धनजंय मुंडे यांनी, ती स्वप्ने, ती आश्वासने आणि ते सपनो के सौदागर २०१९ मध्ये अच्छे दिनबद्दल काही बोलत नाही. अशी टीका करीत मोदी आज देशात सर्वत्र अपयशी ठरल्याचे दिसून येत असून, राज्यात परिवर्तन आणून चोर लोकांच्या हाती सत्ता देऊ नका, असे आवाहन मुंडे यांनी केले.धनंजय मुंडेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करताना, अमित शहा यांना प्रथम अफजल खान बोलायचे आणि कोणतेही पद नसताना आर्थिक संपत्ती कमावली म्हणून ईडीकडून चौकशीची धमकी अमित शहा यांनी दिल्यानंतर उद्धव ठाकरे अफजल खानाच्या गुहेत शिरले, असा आरोप मुंडे यांनी केला. त्यांनी पुढे बोलताना, नरेंद्र मोदी चुकून कधी पंतप्रधान झाले तर ते देशात पुन्हा हुकूमशाही आणतील, अशी भीती मुंडे यांनी व्यक्त केली. या वेळी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे, आमदार सुरेश लाड आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019maval-pcमावळDhananjay Mundeधनंजय मुंडे