शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणातील न्यायालयाच्या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 02:16 IST

मराठा समाजाला १२ टक्के नोकरीत आणि १३ टक्के शिक्षणात आरक्षण देण्याबाबत उच्च न्यायालयाने सकारात्मक निर्णय दिला आहे.

अलिबाग - मराठा समाजाला १२ टक्के नोकरीत आणि १३ टक्के शिक्षणात आरक्षण देण्याबाबत उच्च न्यायालयाने सकारात्मक निर्णय दिला आहे. राज्य सरकारने आपल्या अधिकाराचा वापर करत मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले होते, मात्र न्यायालयाने ते नाकारले. मागासवर्गीय आयोगाने दिलेल्या शिफारशी ग्राह्य धरत न्यायालयाने निर्णय दिल्याने मराठा समाजाने राज्यभर काढलेल्या महामोर्चांना अखेर यश आल्याचे बोलले जाते. न्यायालयाच्या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे, तर राज्य सरकारचे देखील आभार मानण्यात येत आहेत.सकल मराठा समाजाने गेली तीन वर्षे शांततेच्या मार्गाने मोर्चे काढले होते. त्यांचा हा विजय आहे. आघाडी सरकारच्या कालावधीत मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सुरुवात झाली होती. त्याला आताच्या सरकारच्या कालावधीत न्यायालयाच्या निर्णयाने मूर्तरूप आले आहे. राज्य सरकारने आता न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी ही अपेक्षा.- सुनील तटकरे, खासदार, रायगडराज्य सरकारने दोन्ही सभागृहात मराठा आरक्षणाला पाठिंबा मिळवला होता. मागासवर्गीय आयोगाच्या शिफारशी उच्च न्यायालयाने मान्य केल्याने बऱ्याच वर्षांपासूनच प्रश्न निकाली निघाला आहे. मराठा समाजाला आता नोकरी आणि शिक्षणात संधी मिळतील.- सुभाष पाटील, आमदार, अलिबागमराठा समाजाच्या मोर्चांना अखेर यश आले. सरकारने सुरुवातीपासून सकारात्मकता दाखवली होती. त्याला सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पाठिंबा दिला होता. आता न्यायालयाचाही निर्णय आला आहे. त्यामुळे खूपच आनंद होत आहे. सर्वांचेच खूप खूप आभार.- भरत गोगावले, आमदार, महाडमराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत न्यायालयाने निर्णय दिल्याने हा मराठा समाजाचा विजय आहे. त्यांनी केलेल्या परिश्रमाचे फळ मिळाले आहे. राज्य सरकार याबाबत नेहमीच मराठा समाजाच्या पाठीशी उभे होते. शिक्षण आणि नोकरीतील आरक्षणामुळे मराठा समाजाला न्याय मिळेल. सर्वच राजकीय पक्षांतील नेत्यांचे आभार.- अ‍ॅड. महेश मोहिते, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष, रायगडबºयाच कालावधीपासूनची मागणी होती. ती आजच्या न्यायालयाच्या निकालामुळे पूर्ण झाली आहे. या क्रांतिकारी निर्णयामुळे समाजाला खरा न्याय मिळाला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्यांना याचा नक्कीच फायदा होईल. न्यायालयाने सहानुभूतीपूर्वक विचार केला तसेच सरकारही पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, त्याबद्दल सर्वांचे आभार.- रघुजी आंग्रे, रायगड प्राधिकरण, सदस्यन्यायालयाच्या निर्णयाने मराठा समाजाला न्याय मिळाला आहे. हा ऐतिहासिक निर्णय आहे. या निर्णयामुळे मराठा समाजाला निश्चितच दिशा मिळेल. नोकरी आणि शिक्षणातील आरक्षणामुळे समाजातील युवक मागे राहणार नाहीत. हा खरेच आनंदाचा क्षण आहे. सर्वांचेच आभार.- अरविंद पाशिलकर, भारतीय मराठा महासंघ, रायगड

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण