शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

'खरे चौकीदार आम्हीच आहोत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 00:43 IST

श्रीवर्धनचा असून आमचे पूर्वज शिवाजी महाराजांच्या काळात त्यांच्या आरमाराचे एक घटक होते.

नागोठणे : श्रीवर्धनचा असून आमचे पूर्वज शिवाजी महाराजांच्या काळात त्यांच्या आरमाराचे एक घटक होते. स्वत: जातपात मानत नाही. त्या काळी आरमाराच्या माध्यमातून संबंधित मुलखाचे रक्षण करणे हे आमचे मुख्य काम होते, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:ला चौकीदार म्हणत असतील तरी खरे चौकीदार आम्हीच असल्याची स्पष्टोक्ती रायगड जिल्हा काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष दानिश लांबे यांनी नागोठण्यात केली.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासंदर्भात दानिश लांबे यांनी मंगळवारी सकाळी येथील जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस निजाम सय्यद यांच्या निवासस्थानी भेट देऊन मुस्लीम बांधवांशी संवाद साधला. बॅ. अंतुले जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा माझा जन्मसुद्धा झालेला नव्हता.मात्र, त्यानंतर जिल्ह्यात फिरायचो तेव्हा त्यांच्या अद्वितीय अशा कार्याची महती सांगितली जायची. यावर प्रेरीत होऊन बॅ. अंतुले यांच्या जीवनावर पीएचडी करण्याचा निर्णय स्वत: घेतला होता; परंतु त्यांच्या पुत्राने अलीकडेच शिवसेनेत प्रवेश केल्याने माझा पीएचडीचा निर्णय सध्या स्थगित ठेवला आहे. काँग्रेस पक्ष दिलेला शब्द कधीही मोडत नाही. मात्र, मोदींनी मागील पावणेपाच केलेल्या सर्व घोषणा फसव्याच होत्या, हे जनतेला कळून चुकले आहे. त्यामुळे देशाला काँग्रेसशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट होत असून, राहुल गांधी यांना पंतप्रधान होण्यासाठी रायगडातून सुनील तटकरे यांना निवडून द्यावे, असे आवाहन, दानिश लांबे यांनी मुस्लीम बांधवांना केले.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक जण आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षात जात असल्याचे दिसून येत असून, त्यात काही मुस्लीम बांधवांचाही समावेश असल्याचे दिसून येत आहे. कोणी कुठेही गेले, तरी जिल्ह्यातील बहुतांशी मुस्लीम समाज सुनील तटकरे यांच्याच पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचा आत्मविश्वास बिलाल कुरेशी यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला.