शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

नऊ वर्षांपासून रखडली पाणीपुरवठा योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 12:50 AM

पाणीटंचाईचा फटका; खंडाळे, नेहुली, सागाव, तळवली ग्रामस्थ संतप्त

- आविष्कार देसाई अलिबाग : नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी भारत निर्माणअंतर्गत आखण्यात आलेली तब्बल अडीच कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना नऊ वर्षे रखडली आहे. त्यामुळेच खंडाळे, नेहुली, सागाव आणि तळवली येथील नागरिकांना या योजनेपासून वंचित राहावे लागले आहे. राजकीय अनास्था आणि प्रशासकीय उदासीनतेचाच हा परिणाम असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे.‘लोकमत’ने या पाणीप्रश्नावर आवाज उठवल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. पाणीपुरवठा उपअभियंता एकनाथ कुदळे यांनी संबंधित ठेकेदारांची तातडीने बैठक बोलावत काम पूर्ण करण्याबबात तंबी दिली आहे. मे महिन्याच्या अखेरीस काम पूर्ण करण्याचे आश्वासन संबंधित ठेकेदाराने दिले आहे. त्यामुळे आणखीन तीन महिने नागरिकांना वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे.खंडाळे परिसरातील पाण्याचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. नागरिकांना पाणी मिळावे, यासाठी भारत निर्माण अंतर्गत दोन कोटी ५० लाख रुपयांच्या नळ पाणीपुरवठा योजनेला आॅक्टोबर २०११ रोजी तांत्रिक मान्यता देण्यात आली, तर १० फेब्रुवारी २०११ साली प्रशासकीय मान्यता मिळाली होती. काम सुरू केल्यानंतर अद्यापही योजना पूर्ण झालेली नाही. त्यामुळे नागरिकांना एमआयडीसीकडून पुरवण्यात येणाऱ्या पाण्यावर तसेच विहिरी यासह अन्य पर्यायांचा वापर करावा लागत असल्याने ते रोजच्या व्यापाला कंटाळले आहेत.काम करताना आम्हाला खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे. गावातील राजकारणामुळे काम पूर्ण करणे अवघड झाले आहे. ३१ मे २०२० अखेर काम पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन ठेके दारनरेश गोंधळी यांनी उपअभियंता एकनाथ कुदळे यांच्या समक्ष दिले. काम वेळेत पूर्ण न केल्यास ठेकेदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात येईल, असेही कुदळे यांनी सांगितले.एक कोटी २८ लाख ८ हजार ८१२ रु. खर्चठेकेदार काम पूर्ण करत नसल्याने नागरिकांची ससेहोलपट होत आहे.आतापर्यंत उद्भव विहिरीसाठी दहा लाख ३६ हजार ९०३, उध्ववाहिनी तीन लाख ३२ हजार ४९२, वितरण व्यवस्था दोन लाख १२ हजार ३७६, पंपहाउस ७८ हजार, पम्पिंग मशीन सहा लाख १६ हजार ६७१, उंच साठवण टाकी १२ लाख २७ हजार १८७ रुपये, दुय्यम उंच टाकी २० लाख १०३ रुपये, फिडरमेन २१ लाख ५४ हजार २८ रुपये यासह अन्य खर्च एक लाख पाच हजार असे एकूण सुमारे एक कोटी २८ लाख ८ हजार ८१२ रुपये खर्च करण्यात आले आहेत, असे उपअभियंता एकनाथ कुदळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.योजनेसाठी पैसे आहेत. मात्र, ठेकेदार वेळेवर काम पूर्ण करत नसल्याने काम रखडले आहे. संबंधित ठेकेदाराला बोलवून काम लवकर पूर्ण करणाच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही कुदळे यांनी स्पष्ट केले.70% काम आतापर्यंत पूर्णठेकेदाराने आतापर्यंत ७० टक्के काम पूर्ण केले आहे. त्यासाठी त्याला सुमारे एक कोटी २८ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे.उर्वरित ३० टक्के कामासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध आहे. त्यामुळे काम पूर्ण होण्यास प्रशासकीय पातळीवरून कोणतीच अडचण नाही.ठेकेदाराच्या आश्वासनानुसार ३१ मेपर्यंत काम पूर्ण करण्यात येणार आहे; परंतु ठेकेदाराने पुन्हा चालढकल केल्यास नागरिकांना या योजनेपासून वंचित राहावे लागणार आहे.मे महिन्याच्या अखेरीस काम पूर्ण करण्याचे आश्वासन संबंधित ठेकेदाराने दिले आहे. त्यामुळे आणखीनतीन महिने नागरिकांना वाट पाहावी लागणार आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई