शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

रायगड जिल्ह्यातील पाणीटंचाई होणार दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 02:37 IST

रायगड जिल्ह्यामध्ये जलस्वराज्य टप्पा-२ अंतर्गत पाऊस पाणी संकलन योजना कार्यान्वित करण्यात आली होती. कर्जत, पोलादपूर आणि महाड तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये २२ पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या आहेत.

- आविष्कार देसाईअलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये जलस्वराज्य टप्पा-२ अंतर्गत पाऊस पाणी संकलन योजना कार्यान्वित करण्यात आली होती. कर्जत, पोलादपूर आणि महाड तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये २२ पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या आहेत. तब्बल ७६ लाख लिटर पावसाचे पाणी त्यामध्ये साठवले जाणार असल्याने तेथील पाणीटंचाईवर प्रशासनाला सहज मात करता येणार आहे. तीन तालुक्यांत योजना यशस्वी झाल्यामुळे आता १२ तालुक्यांत १८१ पाण्याच्या टाक्या उभारण्यात येणार आहेत. या प्रस्तावांना सरकारने हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे नजीकच्या कालावधीत करोडो लिटर पावसाचे पाणी साठवण्याच्या दिशेने जिल्ह्याचे सकारात्मक पाऊल पडले आहे.जिल्ह्यामध्ये सरासरी साडेतीन हजार मिलीमीटर पाऊस पडतो. जिल्ह्यात हाताच्या बोटावर मोजणारी धरणे आहेत, तर लघुपाट बंधारेअंतर्गत २८ लहान धरणे आहेत. पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असल्याने पहिल्या पावसात आठवडाभरातच सदरची धरणे भरण्यास सुरुवात होते. जुलै महिन्यामध्ये तर ही धरणे दुथडी भरून वाहू लागतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही पावसाच्या पाण्याचे नियोजन न केल्याने सर्व पाणी समुद्राला जाऊन मिळते. पावसाच्या पाण्याचा म्हणावा तसा उपयोग केला जात नसल्याने जिल्ह्याच्या विविध तालुक्यांमध्ये फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणीटंचाईला सुरुवात होते.पिण्याचे पाणी योग्य प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागते. त्यामध्ये महिलांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. काही ठिकाणी तर नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पैसे मोजावे लागतात. यावर मात करण्यासाठी सरकारने जलस्वराज्य टप्पा-२ आखला. त्यामध्ये पाऊस पाणी संकलन योजना कार्यान्वित करण्यात आली. २०१४-२०२० या कालावधीसाठी ही योजना आखण्यात आली आहे. यासाठी जागतिक बँकेचे अर्थसाहाय्य उपलब्ध करण्यात आले आहे.रायगड जिल्ह्यासाठी २७ पाण्याच्या टाक्या मंजूर करण्यात आल्या होत्या. पोलादपूर तालुक्यात १४ पैकी १३ टाक्यांचे काम पूर्ण झाले आहे. महाड तालुक्यात आठ टाक्या प्रस्तावित करण्यात आल्या होत्या. तेथे सहा टाक्यांचे काम पूर्ण झाले आहे. कर्जत तालुक्यामध्ये चार टाक्यांपैकी तीन टाक्यांचे काम पूर्ण करण्यात आले आहे. रोहे तालुक्यातील उसर ठाकूरवाडी येथील एक टाकी मंजूर करण्यात आली होती. मात्र, नंतर ती रद्द करण्यात आली. २७ पैकी २२ टाक्या बांधून पूर्ण झाल्या आहेत. सध्या पावसाचा जोर कायम असल्याने त्या टाक्या भरण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. २२ टाक्यांची एकूण क्षमता ही तब्बल ७६ लाख लिटर आहे. यंदाच्या पावसामध्ये त्या टाक्यांमध्ये पावसाचे पाणी साठवले जात आहे. त्या पाण्याचा उपयोग टंचाईच्या कालावधीत नागरिकांना होणार असल्याने पाण्यासाठी वणवण करावी लागायची ती आता थांबणार आहे.पोलादपूर, महाड, कर्जतमध्ये यशपोलादपूर, महाड आणि कर्जत तालुक्यामध्ये ही योजना यशस्वी ठरल्यामुळे रायगड जिल्हा परिषदेने सरकारकडे आणखीन १८१ ठिकाणी योजना राबवण्याची तयारी दाखवली, मात्र कालावधी कमी असल्याने त्याला मान्यता मिळत नव्हती.रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अभय यावलकर यांनी सातत्याने पाठपुरवा करून रायगड जिल्ह्याच्या पदरात १८१ टाक्यांचे दान पाडून घेतले आहे. त्यामुळे आता नव्याने १२ तालुक्यांमध्ये १८१ टाक्या बांधण्यातील प्रमुख अडथळा आता दूर झाला आहे, असे उपमुख्यकार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे यांनी सांगितले.रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडून देखील जिल्ह्यातील काही गावांमध्ये पाणीटंचाई जाणवते. यासाठी पाऊस पाणी संकलन योजना महत्त्वपूर्ण आहे. १८१ टाक्यांमुळे जिल्ह्यातील गावे टँकरमुक्त होण्यास मदत मिळणार आहे.- अभय यावलकर,मुख्यकार्यकारी अधिकारी

टॅग्स :Waterपाणी