शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

खारेपाटात पाणीटंचाईची समस्या

By admin | Updated: March 22, 2017 01:36 IST

यंदाच्या मान्सून हंगामात ४४४८ मि.मी. विक्रमी पावसाची नोंद होऊन देखील पेणच्या वाशी, पडवळ खारेपाटात मार्चच्या मध्यावरच

पेण : यंदाच्या मान्सून हंगामात ४४४८ मि.मी. विक्रमी पावसाची नोंद होऊन देखील पेणच्या वाशी, पडवळ खारेपाटात मार्चच्या मध्यावरच पणीटंचाईचे चटके बसू लागले आहेत. पेण पंचायत समितीचा पाणीटंचाई कृती आराखडा सव्वा कोटीचा मंजूर केला असला तरीही सन २०१४-१५ या वर्षात खासगी टँकरचे ३५ लाख बाकी तर २०१५-१६ या वर्षातील ५ लाख बाकी मिळून ४० लाख रुपयांची खासगी टँकर मालकाची देणी आहेत. या वर्षीचा डेंजर झोन म्हणजे वाशी खारेपाटातील उत्तर शहापाडा योजनेतील पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी अतिजीर्ण झाल्याने जलवाहिनीचा तळभाग गंजून निकामी झाल्याने पंधरा दिवसाआड जलवाहिनी फुटत आहे. गेल्या दोन दशकांत या समस्येवर प्रभावी उपाययोजना न केल्याने भीषण पाणीटंचाई उद्भवली आहे. यानंतरचे दोन महिने विकतच्या पाण्यावरच खारेपाटाला अवलंबून राहावे लागेल.गेल्या दहा दिवसांपासून शहापाडा धरणातील पाणीसाठा संपल्याने हेटवणे धरणाच्या सिडकोच्या लाइनवरून शहापाडा उत्तर व दक्षिण योजनेतील गावांना पाणी सोडले जाते. या पाण्याचे वेळापत्रक तीन दिवसाआड असून पिण्याचे पाणी कमी दाबाने येत असल्याने मुख्य जलवाहिनीच्या प्रारंभीची गावेच या पाण्याचा लाभ घेतात. शेवटच्या गावांच्या घागरी रिकाम्याच राहतात. पाणी मिळत नाही म्हणून टँकर, टेम्पो यामध्ये प्रतिपिंप ७० ते ८० रुपये या दराने पाणी विकत घ्यावे लागते. पेण पंचायत समिती प्रशासन, तहसीलदार, प्रांत अधिकारी यांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी कोणतीही तजवीज केलेली नाही. खासगी टँकर मालकांची गेल्या दोन वर्षांत ४० लाख रुपयांची देणी बाकी आहेत. जीपीएस यंत्रणेत वाडी वस्त्यावरचे मार्गावरचे पाणी टँकर यंत्रणेत दिसत नसल्याने शासनाकडून आलेले पैसे माघारी गेले. गतवेळच्या पेण पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांनी ही देणी जीपीएस यंत्रणेचा बडेजाव दाखवित न दिल्याने खासगी टँकरवाले आता पहिली बिले चुकती करा, नंतर टँकर देऊ, असे सांगत आहेत. (वार्ताहर)