शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
2
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
3
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी, हरयाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रासह सहा अटकेत 
5
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
6
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
7
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
8
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
9
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
10
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
11
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
12
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
13
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
14
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
15
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
16
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
17
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
18
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
19
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक

पोलादपूर तालुक्यात पाणीटंचाई ?

By admin | Updated: February 24, 2016 03:03 IST

हा अतिदुर्गम म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात एकूण ८७ गावे व २१२ वाड्यांचा समावेश आहे. तालुक्यातून सावित्री, ढवळी, कामथी, चोळई, घोडवणी आदी नद्या वाहतात.

पोलादपूर : हा अतिदुर्गम म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात एकूण ८७ गावे व २१२ वाड्यांचा समावेश आहे. तालुक्यातून सावित्री, ढवळी, कामथी, चोळई, घोडवणी आदी नद्या वाहतात. पावसाळ्यात या नद्या तुडुंब भरून वाहत असतात. मात्र यंदा काही गावांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.पोलादपूर तालुक्यात एकूण नऊ धरणे प्रस्तावित आहेत. मात्र बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी जमिनी देण्यास नकार दिल्यामुळे भूसंपादनाचे काम होऊ शकले नाही, तर काही ठिकाणी प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे कामे सुरूच झाली नाहीत. या वर्षी कोकणात पाऊस कमी प्रमाणात झाल्याने डिसेंबरपासूनच पाणीटंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाकडून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये वनराई बंधारे बांधण्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला जात होता, मात्र यावर्षी लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्याचे आवाहन शासनामार्फत केले आहे, यासाठी लोकप्रतिनिधी व नागरिकांमध्ये सहभागाबद्दल निरुत्साह दिसून येत आहे. या वर्षी भीषण पाणीटंचाई भासणार असून पोलादपूर पंचायत समितीने जिल्हा परिषदेकडे पाठविलेल्या टंचाई आराखड्यात एकूण १३९ विंधन विहीर, ३२ गावे, ११८ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार असल्याचा प्रस्ताव सादर केला आहे. तालुक्यातील चिरेखिंड, वाकण मुरावाडी, कोसमवाडी, आंबेमाची, केवनाळे, कातली बंगला, कालवली भोसले वाडी, विठ्ठलवाडी आदी गावांचा सामवेश आहे. साधारणत: मार्च अखेरपर्यंत या गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागेल असा ग्रामस्थांनी अंदाज वर्तविला आहे. तर पंचायत समितीने पाठविलेल्या आराखड्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी अंदाजित २१.७४ लाखांची तरतूद केली आहे. विंधन विहिरीसाठी ५५.६० लाखांची तरतूद आहे. कोतवाल, कामथे, किनेश्वर गोळेगणी, सवाद आदी ठिकाणी धरणे प्रस्तावित असून एकाही धरणाचे काम झाले नाही. एकमेव देवळे धरण पूर्ण झाले असले तरी त्या धरणाची पाणीगळती काढण्यात लघुपाटबंधारे विभागाला अपयश आले आहे.बंधाऱ्यांची गरजचिरेखिंड येथील ईश्वर ढेबे यांनी टंचाईबाबत प्रतिक्रि या देताना सांगितले की, दरवर्षी शिमग्यानंतर आम्हाला जीवन नकोसे होते. हंडाभर पाण्यासाठी रात्र जागून काढावी लागते. तर रोजगार सोडून दिवसभर बायकापोरं पाण्यासाठी वणवण भटकत राहतात. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ओढ्यानाल्यावर व नदीवर छोटे छोटे बंधारे होणे गरजेचे असून शिवकालीन पाणी योजना पुनर्जीवित कराव्या लागतील, तरच पोलादपूरचा पाणीटंचाई प्रश्न काही प्रमाणात सोडवता येईल.